लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून टॉपर ठरलेली दिशा गिरीश डागा हिला विधिक्षेत्रात करियर करायचे आहे. तिने १२ वीच्या परीक्षेत टॉपर राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. लॉ ची ऑनलाईन एन्ट्रंन्स उत्तीर्ण करून तिने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयू)मधून यशस्वी वकील व्हायचे असल्याचे लोकमतला मुलाखती दरम्यान सांगितले.दिशाला परीक्षेतून ४९१ व चित्रकलेचे ९ असे एकूण ५०० गुण मिळाले आहे. ती जिल्ह्यातून टॉपर ठरली आहेत. स्वत:च्या नोट्स स्वत:च काढून मन लावून अभ्यास केला. माझ्या कुटुंबात कुणीही वकील नसल्याने मला उत्तम वकील व्हायचे आहे. दिशाचे वडील ब्रजलाल बियाणी महाविद्यालयात प्राध्यापक, तर आई खासगी शिकवणी वर्गाच्या संचालिका आहेत. लहान भाऊ आठवीत शिकत असल्याचे तिने सांगितले. आपल्या यशाचे श्रेय ती आई-वडील व शिक्षकांना देते.
SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून दिशा डागा अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:16 IST
इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून टॉपर ठरलेली दिशा गिरीश डागा हिला विधिक्षेत्रात करियर करायचे आहे. तिने १२ वीच्या परीक्षेत टॉपर राहण्याचा मानस व्यक्त केला आहे.
SSC Result 2020; अमरावती जिल्ह्यातून दिशा डागा अव्वल
ठळक मुद्दे सामरा इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी१०० टक्के गुण