विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST2021-03-18T04:13:50+5:302021-03-18T04:13:50+5:30
वरूड भाजपचे तहसीलदारांना निवेदन, पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी वरूड : अमरावती येथे ११ मार्चला गाडगेनगरचे ठाणेदार पोलीस ...

विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला निलंत करा
वरूड भाजपचे तहसीलदारांना निवेदन, पदाधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
वरूड : अमरावती येथे ११ मार्चला गाडगेनगरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक चोरमले यांनी एमपीएससी परीक्षा न देऊ शकलेल्या उमेदवारांवर अमानुष लाठीमार केला तसेच माजी मंत्री अनिल बोंडे यांच्याशी उद्धटपणे वागले. याप्रकरणी चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी तहसीलदारांकडे भाजप महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अर्चना मुरुमकर यांच्या नेतृत्वात निवेदनातून करण्यात आली.
अनिल बोंडे, निवेदिता दिघडे (चौधरी), प्रवीण तायडे, बादल कुळकर्णी, प्रणीत सोनी यांच्यावर विविध कलमान्वये दोन दिवसांनी गुन्हे दाखल करण्यात आले. कोणतीही दडपशाही विद्यार्थी व जनतेला न्याय मागण्यापासून परावृत्त करू शकणार नाही, असे निवेदनात नमूद आहे. यावेळी भाजप महिला आघाडी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नलिनी रक्षे, तालुकाध्यक्ष ज्योती कुकडे, शहराध्यक्ष माधुरी भगत, सरचिटणीस विद्या भुंबर, तालुका उपाध्यक्ष अश्विनी खोडे, प्रतिभा महल्ले, भाजयुमो शहराध्यक्ष नितीन गुर्जर, नगरसेविका अर्चना आजनकर, पुष्पा धकीते, सुवर्णा तुमराम, देवेंद्र बोडखे, किशोर भगत, अपंग सेल तालुकाध्यक्ष गजानन खडसे, आदिवासी आघाडी जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र कोकोडे, कार्यकर्ते नंदकिशोर आजनकर, रामेश्वर खोडे, सुनील कंगाले, मनोज तायवाडे, हर्षद रक्षे आदी उपस्थित होते.