‘ब्रुसीलोसीस’चा आजार फोफावतोय
By Admin | Updated: August 3, 2014 23:03 IST2014-08-03T23:03:18+5:302014-08-03T23:03:18+5:30
मादी जनावरांमध्ये काही जिवाणू संक्रमण करतात. यामुळे गर्भपात होऊन जिवाणुंचा फैलाव होतो. हे जिवाणू मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे ‘ब्रुसीलोसीस’ हा आजार होतो. या आजारामुळे ‘नपुंसकत्व’ येण्याची

‘ब्रुसीलोसीस’चा आजार फोफावतोय
आजारी जनावरांचा संपर्क नपुंसकत्वाला कारणीभूत : २० टक्के व्यक्ती बाधित
गजानन मोहोड - अमरावती
मादी जनावरांमध्ये काही जिवाणू संक्रमण करतात. यामुळे गर्भपात होऊन जिवाणुंचा फैलाव होतो. हे जिवाणू मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. यामुळे ‘ब्रुसीलोसीस’ हा आजार होतो. या आजारामुळे ‘नपुंसकत्व’ येण्याची शक्यता असते. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात २० टक्के व्यक्ती या आजाराने बाधित आहेत. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाचे उपायुक्त प्रकाश उंबरकर यांनी दिली.
या जिवाणूमुळे गाईंचा ७, ८ किंवा ९ व्या महिन्यांत गर्भपात होतो. यावेळी हे जिवाणू बाहेर पडतात. याचा संपर्क मनुष्याशी आल्यास ‘ब्रुसीलोसीस’ हा आजार होतो.
या आजारामुळे गर्भपात, टोंगळ्यावर सूज येणे, अंडकोषावर सूज तसेच सेक्स ग्रंथीवर संक्रमण होऊन नपुंसक होण्याची शक्यता असते. हा आजार प्रामुख्याने गाय, म्हैस, रानगवा, डुक्कर, बकरी, कुत्रा व घोड्यांना संक्रमित करतो. ‘ब्रूसेला एर्बोट्स’ या जिवाणूपासून हा आजार होण्याची शक्यता असते.
असे होते जिवाणुंचे संक्रमण
‘ब्रुसीलोसीस’ हा आजार माणसांना दूषित दुधपदार्थ तसेच आजारी जनावरे, जनावरांचे शव तसेच जनावरांच्या गर्भपाताद्वारे बाहेर येणाऱ्या जिवाणुंमुळे होतो. भारतात जनावरांपासून माणसांना होणाऱ्या आजारांंचे प्रमाण २५.८९ टक्के आहेत. यामध्ये वेदना, प्रॉस्टेट ग्रंथी वाढणे व मानसिक थकवा येतो.
हा जिवाणुजन्य आजार
‘ब्रूसीलोसीस’ हा जीवाणुजन्य आजार ‘ब्रूसेल्ला अबोर्टस’ नावाच्या जीवाणुमुळे होतो. हा रोग प्राण्यापासून माणसाला होतो. या रोगाला बॅग डिसीज, माल्टा फिवर, अंडुलंट फिवर आदी नावानेही ओळखले जाते. या रोगाची लागण झालेल्या प्राण्याचे निर्जंतूक न केलेले दूध किंवा मांस खाल्याने किंवा त्यांच्या शरीरातून निघालेल्या स्त्रावासी संपर्क आल्याने माणवास हा आजार होतो. या रोगाची लागण झालेल्या प्राण्याला कळपातून वेगळे ठेवावे लागते. त्या प्राण्यापासून उत्पादन घेता येत नाही.
असा होतो संसर्ग
निरोगी प्राण्याच्या शरीरात जंतू शिरल्यानंतर ते लिंक ग्रंथीमध्ये स्थिरावतात. तेथून शरीराच्या इतर भागात पसरतात. गाभण नसलेल्या प्राण्यांच्या शरीरात शिरलेले जंतू प्रथम कासेत स्थिरावतात. तेथून हे जंतू गर्भाशयात जातात आणि तेथेच वाढतात. गाभण गाई, म्हशींचे गर्भाशय, कास, नरांमधील अंडाशय सांध्यावरील पोकळी या भागात जंतू घर करतात. जंतुंमुळे कासेच्या आरोग्यामध्ये काही फरक पडत नाही. परंतु गर्भाशयाला जंतुंचा प्रादुर्भाव होत राहतो. गर्भारपणात गर्भाशयावर सूज, दाह आल्याने गर्भ मृत्यू पावतो. बरेचदा जंतू दुधातूनही बाहेर टाकले जातात.