तिवसा नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेवर चर्चा

By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-25T01:13:31+5:302015-07-25T01:13:31+5:30

तिवसा तहसील कार्यालयामध्ये तिवसा नगरपंचायतच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसंबंधी सकारात्मक चर्चा करण्याकरिता तहसील कार्यालयामध्ये नुकतीच एक बैठक पार पाडण्यात आली.

Discussion on Tivasa Municipality's new water supply scheme | तिवसा नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेवर चर्चा

तिवसा नगरपंचायतीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेवर चर्चा

यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न : तहसील कार्यालयात बैठक
तिवसा : तिवसा तहसील कार्यालयामध्ये तिवसा नगरपंचायतच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसंबंधी सकारात्मक चर्चा करण्याकरिता तहसील कार्यालयामध्ये नुकतीच एक बैठक पार पाडण्यात आली. यावेळी तिवस्याचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या कार्यकारी अभियंता श्रीमती श्वेता बॅनर्जी, उपअभियंता आनंद दाश्वत, तिवस्याचे तहसीलदार तथा प्रशासक विजय लोखंडे प्रामुख्याने हजर होते.
अनेक महिन्यांपासून तिवसा येथे अर्धवट असलेली तसेच दूषित व अनियमित पाणी पुरवठा सुरू असणाऱ्या पाणी पुरवठा योजनेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर ग्रामीण पाणी पुरवठा योजनेमध्ये बऱ्याच त्रुट्या आढळल्याने आमदार यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष घातले आहे. त्यासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.प्रत्येक नागरिकांना शुद्ध, स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होणे हे गरजेचे आहे. पाणीपुरवठा कशा पद्धतीने होईल या योजनेतील त्रुट्या कशा दूर करता येईल यासंबंधी यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेकडून माहिती घेतली. सर्व अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. यावेळी मुकुंद देशमुख, दिलीप काळबांडे, संजय देशमुख, वैभव वानखडे, शेतू देशमुख, आशीष खाकसे, सचिन गोरे, अतुल देशमुख, गोकुल खाकसे आदी उपस्थित होते.

Web Title: Discussion on Tivasa Municipality's new water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.