सवलतीच्या दरात एलईडी बल्ब वितरण

By Admin | Updated: October 20, 2015 00:24 IST2015-10-20T00:24:23+5:302015-10-20T00:24:23+5:30

केंद्र शासनाच्यावतीने सवलतीच्या दरात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Discounted LED bulb distribution at discounted rates | सवलतीच्या दरात एलईडी बल्ब वितरण

सवलतीच्या दरात एलईडी बल्ब वितरण

पालकमंत्री : वीज बचतीसाठी शासनाचा उपक्रम
अमरावती : केंद्र शासनाच्यावतीने सवलतीच्या दरात एलईडी बल्ब उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बल्ब वितरणाचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या समारंभास खा.आनंद अडसूळ, आ.बच्चू कडू, आ. सुनील देशमुख, आ. अनिल बोंडे, आ.रमेश बुंदिले, महापौर रिना नंदा, जि.प. अध्यक्ष सतीश उईके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुहास रंगारी उपस्थित होते.
पालकमंत्री ोटे म्हणाले की, पंतप्रधानांनी गरजू ग्राहकांना सवलतीच्या दरात एलईडी बल्ब वितरणाचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. राज्यात सात कोटी एलईडी बल्ब वितरणाचे उद्दिष्ट असून २२ लाख बल्ब आतापर्यंत वितरीत करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात ४ लक्ष ७५ हजार बल्ब वितरित करण्यात येणार आहेत. प्रत्येक कुटुंबास १० बल्ब सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Discounted LED bulb distribution at discounted rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.