मुख्यालयी अनुपस्थित राहिल्यास आता शिस्तभंगाची कारवाई

By Admin | Updated: March 9, 2015 00:43 IST2015-03-09T00:43:59+5:302015-03-09T00:43:59+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून २४ तास

Disciplinary action will be taken if absentee is absent | मुख्यालयी अनुपस्थित राहिल्यास आता शिस्तभंगाची कारवाई

मुख्यालयी अनुपस्थित राहिल्यास आता शिस्तभंगाची कारवाई

रुग्णांचे हाल थांबणार : आरोग्य सहसंचालकांचे आदेश
राजेश मालवीय ल्ल धारणी

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहून २४ तास आरोग्य सेवा द्यावी लागणार आहे. मुख्यालयी गैरहजर आढळल्यास आता कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सहसंचालक आरोग्य सेवा यांनी दिले आहेत. इतकेच नव्हे तर मेळघाटात मुख्यालयी न राहता दांडी मारणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरही कारवाईचे संकेत मिळत आहे.
शासनाने गैरआदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन एमबीबीएस व एका बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्याची आणि आदिवासी भागात प्रत्येकी एक-एक एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशांचे उल्लंघन होत असल्याने रात्री-बेरात्री केंद्रात येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो. उपचाराअभावी कित्येक रूग्णांचा मृत्यू होतो. या प्रकाराची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेऊन मुख्यालयी उपस्थित न राहणाऱ्या राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह, उपकेंद्रे, भरारी पथकातील वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्याबाबतचा अहवाल महिन्याकाठी आरोग्य सेवा संचालनालय व उपसंचालकांना पाठविण्याचे आदेश सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेषत्वाने मेळघाटातील आरोग्य केंद्रांमध्ये मुख्यालयी गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील रूग्णांना अद्ययावत सेवा मिळेल.
शासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी, कामाचे तास निश्चित करावेत. महाराष्ट्र वगळता अन्य राज्यात कामाचे तास निर्धारित आहेत. अन्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही सवलती आहेत. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही सवलत नाही.
- रवींद्र आंडे,
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, कळमखार.

Web Title: Disciplinary action will be taken if absentee is absent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.