उपचारानंतर ६५४ जणांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:22 IST2021-05-05T04:22:07+5:302021-05-05T04:22:07+5:30

रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर पोहोचला ...

Discharge of 654 persons after treatment | उपचारानंतर ६५४ जणांना डिस्चार्ज

उपचारानंतर ६५४ जणांना डिस्चार्ज

रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ११४ दिवसांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ६९,५२७ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

---------------

अन्य जिल्ह्यातील १३९ रुग्णांचा मृत्यू

अमरावती : जिल्ह्यातील रुग्णालयात कोरोना संसर्गाचा उपचार घेत असताना नागपूरसह जिल्हा सीमेलगतचे अन्य जिल्हे व मध्यप्रदेशातील १३९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या मृत्यूची नोंद जिल्ह्यातही घेतल्या जात आहे.

----------------

तुरळक पावसामुळे वातावरणात थंडावा

अमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाच्या तुरळक सरी व ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झालेला आहे. अंगाची काहिली करणाऱ्या उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

--------------

जिल्ह्यात ८,९६१ ॲक्टिव्ह रुग्ण

अमरावती : कोरोनाचा संसर्ग वाढताच असल्याने उच्चांकी ८,९६१ ॲक्टिव्ह रुग्ण आहे. यापैकी २,०४६ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अन्य रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Web Title: Discharge of 654 persons after treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.