अपंग, मतिमंद युवकाची उपचारासाठी वणवण
By Admin | Updated: February 23, 2015 00:52 IST2015-02-23T00:52:43+5:302015-02-23T00:52:43+5:30
स्थानिक सावता कॉलनीतील रहिवासी शशांक रमेश गंधे हा ९५ टक्के अंपग असून फिमोसिस आजारांच्या उपचाराकरिता वणवण भंटकती करीत आहे.

अपंग, मतिमंद युवकाची उपचारासाठी वणवण
अमरावती : स्थानिक सावता कॉलनीतील रहिवासी शशांक रमेश गंधे हा ९५ टक्के अंपग असून फिमोसिस आजारांच्या उपचाराकरिता वणवण भंटकती करीत आहे. इर्विन व सुपर स्पेशालिटी या दोन्ही रुग्णालयातून शशांकला उपचार न करता सुट्टी देण्यात आल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. शशांकला योग्य उपचार मिळावा, अशी मागणी रुग्णाचा मोठा भाऊ संदीप गंधे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.
कृष्णार्पण कॉलनीजवळील सावता कॉलनी येथील रहिवासी शंशांक रमेश गंधे (२३) हा युवक ९५ टक्के अंपग व मतिमंद आहे. शशांकला फिमोसिस आजाराच्या उपचारासाठी १३ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे योग्य उपचार न करता शशांकला दुसऱ्याच दिवशी सुट्टी देऊन पुढील उपचारकरिता सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शंशाकला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचारकरीता नेण्यात आले. मात्र शशांकला मधुमेह असल्याचे निदर्शनास आल्याने त्याला पुन्हा इर्विनमध्ये जाण्याचा डॉक्टरांनी दिला. तसेच २८ फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्याचे सांगून सुट्टी सुध्दा दिली. त्यामुळे शंशाकच्या नातेवाईकांनी पुन्हा शशांकला इर्विन रुग्णालयात उपचारकरिता नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी उपचार केला नाही असा आरोप शशांकचा मोठा भाऊ संदीप गंधे यांनी केला आहे. अपंग रूग्णाची ही अवहेलना तातडीने थांबवून त्याच्यावर योग्य उपचार व्हावेत, असे संदीप यांचे म्हणणे आहे.