पोलीस महासंचालक आज अमरावतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 23:20 IST2018-07-17T23:20:41+5:302018-07-17T23:20:56+5:30
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. पोलीस आयुक्तालयातील बैठकीत ते विभागाचा आढावा घेणार आहे.

पोलीस महासंचालक आज अमरावतीत
अमरावती : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर बुधवारी अमरावती दौऱ्यावर येणार आहेत. पोलीस आयुक्तालयातील बैठकीत ते विभागाचा आढावा घेणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महासंचालक पडसळगीकर आढावा बैठक घेणार असून, यावेळी पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षकांची उपस्थिती राहणार आहे. पोलीस महासंचालक बनल्यानंतर पडसलगीकर प्रथमच अमरावतीत येत आहेत. नागपूर अधिवेशनातील कामकाज आटोपून ते बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत ही आढावा बैठक घेणार आहेत.