विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:11 IST2021-05-24T04:11:57+5:302021-05-24T04:11:57+5:30
याकरिता तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे फळे व भाजीपाला विक्रीकरिता उपलब्ध आहे, अशा त्यांची माहिती घेऊन व्हाॅट्सॲप ग्रुप बनविण्यात आला आहे. ...

विकेल ते पिकेल अभियानांतर्गत शेतकरी ते थेट ग्राहक विक्री
याकरिता तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे फळे व भाजीपाला विक्रीकरिता उपलब्ध आहे, अशा त्यांची माहिती घेऊन व्हाॅट्सॲप ग्रुप बनविण्यात आला आहे. त्यानंतर कृषी विभाग व महापालिका यांच्यामार्फत संचारबंदी कालावधीत फळे व भाजीपाला शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीकरिता पासेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भातकुली तालुक्यातील एकूण २५ शेतकऱ्यांना तशा पासेस देण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील अंचलवाडी, निरुळ गंगामाई, बहादरपूर, गणोरी, उत्तमसरा, रामा, शिवनी, सायत, नावेड इत्यादी गावांमधील वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी व महिला बचत गटांचा समावेश आहे.
संचारबंदीत केलेल्या शेतकरी ते थेट ग्राहक विक्रीमध्ये मिरची, वांगे, कारले, भेंडी, पालक, गवार, चवळी, टोमॅटो, मेथी, बटाटे, कोथिंबीर, आले, कांदा, लसूण इत्यादी भाजीपाला व टरबूज लिंबू यांसारख्या फळांचा समावेश आहे.