परीक्षेच्या गुणांकनावरुन आता थेट नियुक्ती
By Admin | Updated: November 2, 2014 22:22 IST2014-11-02T22:22:54+5:302014-11-02T22:22:54+5:30
नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो.

परीक्षेच्या गुणांकनावरुन आता थेट नियुक्ती
निवड समितीला आदेश : शासकीय नोकरीसाठी मुलाखत प्रक्रिया बाद
अमरावती : नोकरीसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यापासून ते मुलाखतीपर्यंत विद्यार्थ्यांना सर्व प्रक्रिया पार पाडावी लागते. यातही निवड समितीसमोर मौखिक परीक्षा म्हटली की, उमेदवार पहिलेच अर्धा गर्भगळीत होतो. आता उमेदवारांना धीर मिळाला आहे. नियुक्ती प्रक्रियेत ही मौखिक परीक्षाच बाद केली आहे. विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेच्या गुणांकरावरुन त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबत आदेश जिल्हा निवड समितीला प्राप्त झाले आहे.
सद्यस्थितीत लाखो हातांना रोजगार नाही. एक रीक्त पदाची जाहिरात असली तरी हजारो अर्ज येतात, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेत प्रथम लेखी परीक्षा व नंतर मौखिक परीक्षा असते. या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि मौखिक परीक्षेत उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वावर मिळालेल्या गुणांच्या बेरजेवर शासकीय नोकरी मिळायची परीक्षेत जरी अधिक गुण मिळाले असले तरी मुलाखतीत मात्र उमेदवाराचा अवसानघात झाल्यास त्याची निवड होत नव्हती या मौखिक परिक्षेदरम्यान अनेक गैरप्रकार घडल्याचे कित्येक उदाहरणे आहेत. परंतु आता लेखी परीक्षेच्या गुणांकारावर आधारित नोकरी मिळत असल्याने अनेक गैरप्रकारांना आपसूक आळा बसणार आहे.
लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, आणि आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक होते. आता २०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवारांची निवड करण्याचे ग्रामविकास विभागाने आदेश काढले आहेत. या आदेशान्वये आता जिल्हा परिषदेत विविध पदांची भरती प्रक्रिया होेणार आहे.
हजारो विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने परीक्षार्थींची गुणवत्तेवर निवड होणार आहे व गुणवंतांना न्याय मिळणार आहे. हुषार विद्यार्थ्यांना ही संधी चालून आली आहे.