शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

३० हजार वारकऱ्यांची आज दिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:24 PM

रेवसा नजीकच्या १२ एकरावर २१ जानेवारीला ३० हजार गजाननभक्त एकाच वेळी महापारायण करणार आहेत.

ठळक मुद्देउद्या रेवसा येथे महापारायण : एक लाख भाविक घेणार महाप्रसाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : रेवसा नजीकच्या १२ एकरावर २१ जानेवारीला ३० हजार गजाननभक्त एकाच वेळी महापारायण करणार आहेत. तत्पूर्वी शनिवार, २० जानेवारीला सकाळी शहरातील मुख्य चौकांतून ३० हजार वारकऱ्यांची दिंडी निघणार आहे. शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने वारकरी महापारायण व दिंडीत सहभागी होणार आहेत.श्री गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण समितीतर्फे महापारायण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, रेवसा नजीकच्या १२ एकर शेतामध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे. भक्तांच्या सेवेकरिता शहरात महाराष्ट्रीय वेशभूषेत पाच हजार सेवेकरी तैनात राहणार आहेत. पिण्याच्या पाण्यापासून तर भोजन आणि औषधाची सुविधा आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे. बसस्थानक, राजकमल चौक, बडनेरा आणि पंचवटी चौक या ठिकाणांवरून भाविकांसाठी वाहनव्यवस्था करण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या वाहनांद्वारेही प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. राज्यातील सर्व भागातून भाविक निघाले असून, दिंडी सुरू होण्यापूर्वी ते शहरात दाखल होत आहेत. पारायणस्थळी सुमारे सव्वा लाख भाविकांची व्यवस्था केली आहे.पारायणासाठी शुभ्र वस्त्र व लाल साडीमहिलांनी शक्यतोवर लालसाडी परिधान करावी, पुरुषांनी पांढऱ्या रंगाचा बंगाली शर्ट, पांढरा पैजामा किंवा धोतर आणि टोपी घालावी. दिडींत सहभागी होणाऱ्या महिला व युवतींनी पिवळ्या रंगाच्या साड्या किंवा त्याच रंगाचा पंजाबी ड्रेस शक्यतोवर परिधान करावा.नोंदणीचा महापूरमहापारायणासाठी नोंदणी हाऊसफुल्ल झाली असून, ती ३० हजारांवर गेल्याचे आयोजन समितीने कळविले. जिल्ह्याबाहेरील १८ हजार भाविकांनी नोंदणी केली. हा सोहळा विश्वबंधुत्व व सर्वधर्म समभावाचे प्रतीक ठरल्याचे नोंदणीवरून निदर्शनास येते. सात मुस्लीम व अमेरिकेहून आठ भाविकांनीही सोहळ्यात पारायणासाठी नोंदणी केली आहे.वाहतूक मार्गात बदलमहापारायणामुळे पोलीस प्रशासनाने वाहतूक मार्गात बदल केले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेकरिता कठोऱ्यापुढील रजनी मंगल कार्यालय ते रेवसा व राजपूत ढाबा ते चांगापूर फाटा मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविली जाणार आहे. २१ जानेवारीला सकाळी ५ ते सायंकाळी ६ या वेळेत रजनी मंगल कार्यालयाकडून पारायण स्थळी सर्व प्रकारच्या वाहनांना जाता येईल. मात्र, परत रेवसा गावाकडून कठोरा नाका किंवा वलगाव मार्गे येता येईल. राजपूत ढाबाकडून चांगापूर नार्गे वलगाव, परतवाडा, दर्यापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी नवसारी रिंगरोड चौक ते चांगापूर फाटा या मार्गाचा अवलंब करावयाचा आहे.वारकरी होताहेत दाखलगुरुवारपासून वारकरी भाविकांचे शहरात आगमन होत आहे. त्यांच्या निवासाकरिता शहरातील १९ मंगल कार्यालये बूक करण्यात आली आहेत. त्यांना मंडपात पोहोचण्याकरिता ६५ खासगी बसची सुविधा समितीने केली आहे.चोख व्यवस्थाविशाल मंडपामध्ये २६ सीसीटीव्ही कॅमेरे, प्रक्षेपणासाठी चार भव्य एलईडी स्क्रीन आहेत. पारायणस्थळी हव्याप्रमंडळाचे ३०० सुरक्षा रक्षक सज्ज राहणार असून शहरात जागोजागो मदत व चौकशी केंद्र उघडण्यात आले आहे.