धनेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दिगंत नेते पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:06+5:302021-01-19T04:16:06+5:30
अंजनगाव सुर्जी : तालुक्यात चर्चेत असलेल्या धनेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पन्नास वर्षांत प्रथमच जनतेने बहुमतात हेमंत पंजाबराव येवले यांच्या नेतृत्वात ...

धनेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दिगंत नेते पराभूत
अंजनगाव सुर्जी : तालुक्यात चर्चेत असलेल्या धनेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पन्नास वर्षांत प्रथमच जनतेने बहुमतात हेमंत पंजाबराव येवले यांच्या नेतृत्वात परिवर्तन पॅनलचा झेंडा फडकवला.
नऊ सदस्यीय धनेगाव ग्रामपंचायतीत परिवर्तन पॅनलचे सात सदस्य विजयी झाले. बहुजन विकास पॅनेल ( हाडोळे गट) चे दोन सदस्य विजयी झाले आहे. निवडणुकीत दिग्गज पराभूत झाले आहेत. यात माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विकास येवले यांच्या अर्धांगिनी सुचिता विकास येवले व माजी आमदार रावसाहेब हाडोळे यांचे चिरंजीव अविनाश हाडोळे यांचा समावेश आहे. चर्चेतील उमेदवार मुकुंद प्रभुदास येवले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले
---
पथ्रोटात भाजपची मुसंडी
दोन तपानंतर सत्ता. महाविकास आघाडीचे पाणीपत
पथ्रोट : ग्रामपंचायत निवडणुकीत दोन तपानंतर भाजपसमर्थित व जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रसे यांच्या नेतृृृत्वातील श्री जयसिंगबाबा पॅनलने एकहाती सत्ता संपादन केली. महाविकास आघाडी समर्थित शिवसाई रत्न पॅनलचे पानिपत झाले आहे.
प्रभाग १ मधून सुनंदा सुनील वानरे, संध्या मनोज वडतकर, प्रभाग ३ मधून शोभा प्रभाकर काळे, सचिन सुरेशसिंह जरोले व प्रभाग ६ मधून सीमा मंगेश दांडगे या महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला.
प्रभाग २ मधून संजय संपत कैकाडे, अरुण लाखाराम लिल्हरे, किरण जितेंद्र सावकर, प्रभाग ३ मधून योगेश मधुकर मोहोड, प्रभाग ४ मधून सुधीर सुखदेव भलावी, नंदा महेश राऊत, मनीषा बळीराम सुरसाऊत, प्रभाग ५ मधून दीपाली सागर मामनकर, अतुल सुधार वाठ, रूपाली अनिलसिंह वर्मा, प्रभाग ६ मधून राजेश्वरी श्रीकांत मेहश्रे, सुधीर रमेश गोवारे हे श्री जयसिंह बाबा पॅनलचे उमेदवार विजयी झाले. १७ सदस्यसंख्या झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ४१ उमेदवारांनी नशीब आजमावले. माजी महिला सरपंच पतीचा पराभव झाला, तर माजी सरपंचाची पत्नी विजयी ठरली.