कलेक्ट्रेटवर धडकल्या विविध संघटना
By Admin | Updated: March 24, 2015 00:01 IST2015-03-24T00:01:25+5:302015-03-24T00:01:25+5:30
ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनी सोमवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक दिली

कलेक्ट्रेटवर धडकल्या विविध संघटना
अमरावती : ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांनी सोमवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक दिली. यावेळी विविध संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडे समस्यांचे निवेदने दिलीत. यामध्ये पथ्रोट येथील मागासवर्गीय वस्ती असलेल्या वॉर्ड क्रमांक ४ मधील जागा कायमस्वरूपी रहिवाशांच्या नावाने करावी, निम्नपेढी प्रकल्पग्रस्ताचे नविन भूसंपादन कायद्यानुसार घरकुल व भूखंड देऊन पुनर्वसन करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. तर राष्ट्रवादी युवक कॉग्रेस शहर जिल्हयाचे वतीने भाजी बाजार येथील देशी दारूचे दुकान स्थलांतरीत करावे अशी मागणी केल्या आहेत. (प्रतिनिधी)