मतदान प्रतिनिधीच्या बेरजेमध्ये तफावत; निवडणूक अधिकाऱ्यांकडे शेखर भोयर यांचा लेखी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 18:28 IST2020-12-04T18:27:24+5:302020-12-04T18:28:58+5:30
मात्र हा अर्ज नाकारण्यात आला व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तसे शेखर भोयर यांना लेखी दिले.

मतदान प्रतिनिधीच्या बेरजेमध्ये तफावत; निवडणूक अधिकाऱ्यांकडे शेखर भोयर यांचा लेखी अर्ज
अमरावती: अपक्ष उमेदवार संगीता शिंदे यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांना महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या पेक्षा जास्त मते असल्याचे भोयर म्हणाले. त्यांच्या मतदान प्रतिनिधीच्या बेरजेमध्ये ही तफावत दिसून आली. यामुळे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी पियुष सिंह यांच्याकडे सदर राऊंडच्या मतमोजणीसाठी अर्ज सादर केला. मात्र हा अर्ज नाकारण्यात आला व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तसे शेखर भोयर यांना लेखी दिले.