निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:44+5:302021-03-04T04:23:44+5:30
फोटो - वरूड : तुळसाबाई भीमाजी लव्हाळे (१०३, रा. हातुर्णा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार ...

निधन
फोटो -
वरूड : तुळसाबाई भीमाजी लव्हाळे (१०३, रा. हातुर्णा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली व बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर हातुर्णा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
------
जैनपूर येथे वृद्धेला मारहाण
येवदा : नजीकच्या जैनपूर येथे आरोपींनी लग्न मोडल्यानंतर त्याच कुटुंबातील वृद्धेला खालून पाडून मारहाण केली. यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला व रक्त निघाले. याप्रकरणी येवदा पोलिसांनी सुरेश गाडे, संतोष गाडे, हरीश गाडे यांच्याविरुद्ध भादंवितचे कलम १४३, ३२४, ३२३ अन्वये मंगळवारी गुन्हा दाखल केला.
---------
बेनोडा येथे वृद्धाला ट्रॅक्टरची धडक
बेनोडा : येथील मनोज ठाकरे यांच्या घराजवळ एमएच २७ बीबी १२०१ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने किशोर मारोतराव पांडे (६३) यांना धडक देण्यात आली. त्यामुळे त्यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला. याप्रकरणी विनोद वडस्कर (४१, रा. मलकापूर) यांच्या तक्रारीवरून बाबू ऊर्फ प्रभाकर कासे (५०) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
--------
रक्कम मागितली
काठीने केले जखमी
कावली वसाड : अचलपूर तालुक्यातील चमक बु. येथील शिवहरी नांदणे हे मन्नू ऊर्फ रोशन रमेश खानंदे याच्याकडे तीन हजार रुपये मागण्याकरिता गेले होते. त्यांना डोक्यावर काठीने मारहाण करून जखमी करण्यात आले. पुढील उपचारासाठी अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.