वरुड येथे अतिसाराची लागण
By Admin | Updated: July 15, 2015 00:19 IST2015-07-15T00:19:20+5:302015-07-15T00:19:20+5:30
तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने आणि अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वरुड येथे अतिसाराची लागण
दवाखान्यात गर्दी : आरोग्य खात्याने दिला दक्षतेचा सल्ला
वरूड : तालुक्यात पाऊस बेपत्ता झाल्याने आणि अचानक वातावरणात बदल झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अतिसार, सर्दी खोकलासह आदी आजाराने नागरिक त्रस्त झाले असून खासगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांची गर्दी आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याकरिता तातडीने संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी केले आहे.
तालुक्यात २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला. जुलै महिन्यात सर्दी खोकला, अतिसाराची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने दखावान्यात गर्दीच दिसून येते. यामध्ये वृध्द, तरुण, महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील लोणी, पुसला, राजूराबाजार, आमनेर, शेंंदूरजनाघाट या आरोग्य केंद्रात सुध्दा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात ३०० ते ४०० रुग्ण आरोग्य तपासणीकरीता येत आहे. वातावरणीय बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन खोकला, ताप, तसेच डायरियाच्या आजाराने कहर केल्याचे चित्र तालूक्यात आहे. यामुळे आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
यामध्ये अॅनाफिलीस डासांच्या मादीपासून पसरणारा हा आजार असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. हा डास घरगुती पाणी वापराची भांडी, टाकी, राजण, मोठ, हौद,तसेच परिसरातील डबके, निरुपयोगी वस्तू नेहमी साफसफाई करुन ठेवाव्या. टायर, प्लास्टिकच्या वस्तूची विल्हेवाट लावावी. डबके, गटारे वाहती करावी, शौचालयाच्या व्हेन्टीलेटर पाईपच्या तोंडाला पिशवी बांधावी. वॉटर कुलर, फुलदाण्या, फवारे, कारंजे यातील दोन-तीन दिवसाआड पाणी बदलावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील भांडीकुंडी कोरडी करुन ठेवावी. खिडक्या, दरवाज्यांना जाळी बसविण्यात यावी. या सर्व बाबींची अंमलबजावणी केल्यास डेंग्यू, हिवताप, जेई, चिकूणगुणिया, मलेरीया, डायरिया या आजारापासून सुटका होऊ शकते. (तालुका प्रतिनिधी)
नागरिकांनी स्वच्छता ठेवणे गरजेचे
ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. जलजन्य आणि वायूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. यासाठी वैयक्तिक स्वच्छता महत्वाची आहे. शेणखताचे उकीरडे, नालीतील साचलेले पाणी, घनकचरा, घाणीच ेसाम्राज्य स्वच्छ करावे. हिवताप, सर्दी खोकला, डायरिया या आजारावर मात करावयाची असल्यास पाणी उकळून प्यावे तसेच साथीचे आजार आल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात तपासणी करावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांनी केले आहे.
तालुक्यात दरवर्षी साथरोगाचा फैलाव होतो.ूयावर प्रतिबंधात्मक उपायोजना करणे गरजेचे असते. जलजन्य , वायू जन्य आजारापासून सावध राहण्याकरीता दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला, ताप आल्यास तसेच डायरीया, अतिसार झाल्यास त्वरीत नजिकच्या आरेगा्य केंंद्राशी संपर्कसाधून उपचार करावे.
- प्रमोद पोतदार,
वैद्यकिय अधिकारी, वरुड