अतिसार, अज्ञात तापाची लागण
By Admin | Updated: May 25, 2014 23:14 IST2014-05-25T23:14:53+5:302014-05-25T23:14:53+5:30
साडेतीनशे लोकसंख्येच्या गावात अतिसार व तापाने कहर केला असून यात गावातील १0 ते १२ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील एक रुग्ण नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दगावला.

अतिसार, अज्ञात तापाची लागण
सुरेश सवळे - चांदूरबाजार साडेतीनशे लोकसंख्येच्या गावात अतिसार व तापाने कहर केला असून यात गावातील १0 ते १२ रुग्ण विविध रुग्णालयात दाखल झाले आहेत. यातील एक रुग्ण नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दगावला. या प्रकारामुळे गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आ. बच्चू कडू, जिल्हा परिषद आरोग्य सभापती मनोहर सुने यांनी दिलालपूर येथे भेट दिली. जबाबदार व्यक्तिंवर कारवाईचा इशाराही दिला दिलालरपूर येथे अतिसारा व अज्ञात तापाची लागण झाली आहे. आतापर्यंत १२ रुग्णांना अतिसाराने वेढले असून यामुळे मंगेश शिवानंद जंगम या १९ वर्षीय युवकाचा नागपूर येथील लता मंगेशकर रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दूषित पाणीपुरवठा, सांडपाणी तसेच पूर्णा धरणातून कालव्यात सोडण्यात येणारे पाणी नाल्यात साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. तर निंभोरा येथे रोगराईसाठीअस्वच्छता कारणीभूत असल्याची कबुली सरपंच स्वाती भाकरे यांनी दिली आहे. अज्ञात तापाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये रोहिणी चेंडके (१६), पवन डोंगरे (१७), वेणू दाभाडे, स्नेहा भाकरे, अलका तायवाडे, मधुकरराव तायडे, युवराज डोंगरे (१७), रोशन तायवाडे व मंगेश जंगम (१९) आदींचा समावेश आहे. त्यातील मंगेश जंगम याचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर रुग्ण विविध खासगी रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. येथे पाण्याची टाकी बांधण्यात आलेली नाही. विंधन विहिरीतून पाणी पुरवठा केला जात आहे. ब्लिचिंग पावडरचा वापर केला जात नाही. जुन्या पाईपलाईनमधून अद्यापही पाणीपुरवठा सुरू आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी या गावात एकच नाली आहे. साफसफाई होत नसल्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढतो आहे.