काटकुंभ येथे अतिसारची लागण
By Admin | Updated: October 21, 2014 22:43 IST2014-10-21T22:43:18+5:302014-10-21T22:43:18+5:30
तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तीन दिवसांपासून ६० पेक्षा अधिक नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २५ रूग्णांवर उपचार सुरू आहे.

काटकुंभ येथे अतिसारची लागण
चिखलदरा : तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तीन दिवसांपासून ६० पेक्षा अधिक नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २५ रूग्णांवर उपचार सुरू आहे.
ग्रामपंचायतमार्फत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून दूषित पाणी आल्याने नागरिकांना अतिसारची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गावातील नळ योजनेंतर्गत घरापुढे नळासाठी खड्डे खोदण्यात आले आहे. त्या खड्ड्यातून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शनिवारपासून अलका राठोर (१०), निलू राठोड (३०), रामकिसन बरडे (२१), शकुंतला भाकरे (७१), पुष्पा मालवीय (३५), मालती राठोड (४५), अनिता बेठेकर (२८), किशोर सतवासे (२८), बलू पंचम बेठे (५६), सायबू झाडखंडे, सायबू काल्या झाडखंडे (६०), कलेसिया झाडखंडे (६०), नितीन बेठेकर (३२) आदी रुग्णावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.
सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
(तालुका प्रतिनिधी)