‘ढेरपोटे’ पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST2021-09-09T04:17:05+5:302021-09-09T04:17:05+5:30

अमरावती : पोट सुटणे ही पोलिसांपुढे मोठी समस्या आहे. ढेरपोटे झाल्यानंतर या पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पोलिसांची ...

‘Dherapote’ police grew; How to maintain health indefinitely? | ‘ढेरपोटे’ पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य?

‘ढेरपोटे’ पोलीस वाढले; अनिश्चित वेळेत कसे राखणार आरोग्य?

अमरावती : पोट सुटणे ही पोलिसांपुढे मोठी समस्या आहे. ढेरपोटे झाल्यानंतर या पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पोलिसांची ही समस्या सोडवण्यासाठी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच मनावर घेतले आहे.

पोलिसांना यापूर्वी खासगी रुग्णालयातही फीट प्रमाणपत्र घेता यायचे. आता ते केवळ शासकीय रुग्णालयांतून घ्यावे लागते. त्यामुळे अनेकांची त्यासाठी धावाधाव सुरू असते. पोलीस दलात फिटनेस हा कायम असावा लागतो. गुन्हेगारांचा पाठलाग, दंगल काबू आणणे, आपत्कालीन प्रसंगी होणारी धावाधाव यासाठी हा फिटनेस पाहिजे; मात्र अनेक पोलीस कर्मचारी याबाबीकडे दुर्लक्ष करतात. परिणामी त्यांचा स्थूलपणा वाढत जाऊन ते ढेरपोटे होतात. या ढेरपोटे पोलिसांकडून पोलीस दलाला साजेसे काम होत नाही. नाइलाजाने अधिकाऱ्यांना यांना बैठे काम द्यावे लागते. त्यामुळे वेळोवेळी त्यांची रक्तदाब, मधुमेह आदी तपासणी करण्यात येते. योगासने, मेडिटेशन, वैद्यकीय मार्गदर्शनदेखील तज्ज्ञामार्फत करण्यात येणार आहे.

..............

जेवणालाही वेळ मिळत नाही

‘सणासुदीच्या काळात फिक्स पॉईंट लावले जातात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी २४ बाय ७ तैनात राहावे लागते. त्यामुळे अनेकदा जेवणालाही वेळ मिळत नाही.

एक पोलीस कर्मचारी

/////

‘कोरोनाकाळात महामार्गावरील अनेक ठिकाणी पोलिसी टेंट उभारण्यात आले. मात्र, त्या काळात जेवण तर सोडाच पिण्याच्या पाण्याचीदेखील भ्रांत जाणवली. घरून डबा नेला, तरच पोटात पडायचे.

एक पोलीस कर्मचारी

//////////

कसे राखणार आरोग्य?

शहर तथा ग्रामीणमधील गुन्हेगारी वाढतीच आहे. मात्र, त्या तुलनेत पोलीस खात्यात मनुष्यबळाचा अनुशेष वाढताच आहे. त्यामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना नानाविध कामे करावी लागतात. अनेक पातळीवर झगडावे लागते. बंदोबस्ताच्या वेळी तर पोटात वेळेवर अन्नही पडत नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी आरोग्य राखणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण होतो.

//////////

पोलीसप्रमुख कोट

/

एक हजार अर्ज

/////

Web Title: ‘Dherapote’ police grew; How to maintain health indefinitely?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.