धारणीकर ‘बंद’ने करणार नववर्षाचे स्वागत

By Admin | Updated: December 22, 2015 00:09 IST2015-12-22T00:09:42+5:302015-12-22T00:09:42+5:30

बुधवारी तीन शाळकरी आदिवासी मुलींवर अल्पसंख्यक समुदायाच्या चार युवकांनी केलेल्या दुराचार प्रकरणाबाबत सोमवारी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.

Dharnikar will welcome 'Bandh' to New Year | धारणीकर ‘बंद’ने करणार नववर्षाचे स्वागत

धारणीकर ‘बंद’ने करणार नववर्षाचे स्वागत

 संघटनांचा निर्णय : मुलींवरील अत्याचार प्रकरण
धारणी : बुधवारी तीन शाळकरी आदिवासी मुलींवर अल्पसंख्यक समुदायाच्या चार युवकांनी केलेल्या दुराचार प्रकरणाबाबत सोमवारी चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. या चिंतन बैठकीत नववर्षाचे स्वागत धारणी तालुका बंद ठेऊन ्र्रकरण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या बंदमध्ये शैक्षणिक संस्था सुद्धा सहभागी होणार आहेत. १ तारखेला शुक्रवार असल्याने धारणीचा आठवडी बाजार असतो. तरीही सर्व संघटनांनी स्वयंस्फूर्तीने बंद पुकारण्याकरिता १ जानेवारी हा दिवस निवडला आहे, हे विशेष.
सोमवारी दुपारी १ वाजता स्थानिक आदिवासी समाज मंदिरात २७ संघटनांचे शेकडो पदाधिकारी एकत्र आले. बुधवारी अल्पवयीन मुलींवर विशिष्ट समुदायाच्या युवकांकडून झालेल्या अत्याचाराचा सर्व संघटनांकडून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पालकांसह समस्त नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले. आदिवासी नेते हिरालाल मावस्कर यांच्या पुढाकाराने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला रमेश तोटे, मोतीलाल कास्देकर, सदाशिव खडके, वामना भारसाकळे, विनायक वरघट, आप्पा पाटील, प्रियम चौकसे, श्रीपाल पाल, हरेराम मालवीय यांनीविचार मांडले. हिंदू, बौद्ध, बलई, ब्राह्ममण बसोड, भिलाला, कोरकू, गोंड, गवळी, कलाल, गवळान या समाजातील जवळपास २७ संघटनेतील कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dharnikar will welcome 'Bandh' to New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.