धारणीचे रेडिओप्रेमी गुलजारभाई !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:12 IST2021-04-06T04:12:11+5:302021-04-06T04:12:11+5:30
धारणी : शहरातील जयस्तंभ चौक येथे १५ ते २० वर्षांपासून असलेल्या एका छोट्याशा पानटपरीचे मालक गुलजारभाई. विशिष्ट शैलीमुळे ते ...

धारणीचे रेडिओप्रेमी गुलजारभाई !
धारणी : शहरातील जयस्तंभ चौक येथे १५ ते २० वर्षांपासून असलेल्या एका छोट्याशा पानटपरीचे मालक गुलजारभाई. विशिष्ट शैलीमुळे ते धारणीकरांसाठी वेगळी व्यक्तिमत्त्व ठरले आहेत. आजच्या अत्याधुनिक युगात लोकांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आला असताना, गुलजारभाई हे रेडिओच्या माध्यमातून देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतात.
सकाळी साधारणत: दहा वाजता दुकान उघडल्यानंतर गुलजारभाई रेडिओ सुरू करतात. त्यांच्याकडे असलेला हा दुसरा रेडीओ. त्यांना जुनी गाणी ऐकण्याची विशेष आवड आहे. मनोरंजनासह ऐतिहासिक माहिती देणारे विविध कार्यक्रम एफएम शॉर्ट बँड विड्थमार्फत प्राप्त होत असल्याचे ते सांगतात. इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्ती आणि विशेष दिवसांबाबतची माहिती ते आवर्जून ऐकतात. त्यांचे रेडिओचे प्रेम पाहून सर्वांना आश्चर्य वाटते. आज प्रत्येक मोबाईलमध्ये एफएम रेडिओ असतो. मात्र, मोबाईलपेक्षा खास रेडिओ संचावरून गाणे ऐकण्याची मौज ‘औरच’, असे ते आवर्जून सांगतात.
-------------------------------------