सांगली, साताऱ्यापर्यंत पवन महाराजचे भक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:39 IST2018-07-02T23:39:03+5:302018-07-02T23:39:18+5:30
भोंदूबाबा पवन घोंगडे महाराजला 'जमीन निगली गई या आसमां खा गया' असा पेच पोलिसांना पडला आहे. भक्ताकडे लपल्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी गेलेल्या पोलिसांची मती पवन महाराजचा ‘भक्तपरिवार’ पाहून गुंग झाली. त्याचा भक्तमंडळ सांगली-साताºयांपर्यंत असल्याची बाब या तपासात पुढे आली.

सांगली, साताऱ्यापर्यंत पवन महाराजचे भक्त!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भोंदूबाबा पवन घोंगडे महाराजला 'जमीन निगली गई या आसमां खा गया' असा पेच पोलिसांना पडला आहे. भक्ताकडे लपल्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी गेलेल्या पोलिसांची मती पवन महाराजचा ‘भक्तपरिवार’ पाहून गुंग झाली. त्याचा भक्तमंडळ सांगली-साताºयांपर्यंत असल्याची बाब या तपासात पुढे आली.
डिटेक्शनमध्ये माहीर असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी पवन महाराजच्या शोधासाठी दिवस-रात्र एक केली आहे. मात्र, अद्याप पवन महाराजचा सुगावा लागलेला नाही. पवन महाराज कोणत्या ना कोणत्या भक्ताच्या आश्रयाला असावा, अशी शंका उपस्थित झाली असतानाही तो पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे दिसून येत आहे. पवनच्या घरी दूध पोहचविणारा विक्रेता आता एका भक्ताच्या घरी दुध नेत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या भक्ताच्या राज्याबाहेरील नातलगाकडे पवन असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस सूत्रे हलणार आहेत.