एका आठवड्यातील ७५ रुग्णांमुळे देवमाळी बनले ‘हॉट स्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:19 IST2021-02-23T04:19:33+5:302021-02-23T04:19:33+5:30

फोटो पी २२ देवमाळी संशयित कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, बुरडघाट केंद्रातून शिक्षकाचे पलायन परतवाडा : शहरालगतच्या देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत अवघ्या सात ...

Devmali becomes 'hot spot' due to 75 patients in a week | एका आठवड्यातील ७५ रुग्णांमुळे देवमाळी बनले ‘हॉट स्पॉट’

एका आठवड्यातील ७५ रुग्णांमुळे देवमाळी बनले ‘हॉट स्पॉट’

फोटो पी २२ देवमाळी

संशयित कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, बुरडघाट केंद्रातून शिक्षकाचे पलायन

परतवाडा : शहरालगतच्या देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत अवघ्या सात दिवसांत ७५ हून अधिक कोरोना संक्रमित निष्पन्न झाले. यातील ६० कोरोनाग्रस्तांची नोंद ग्रामपंचायतीकडे आहे.

कोरोना रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी केंद्रावर १५ फेब्रुवारीला एकाच दिवशी एकूण १६ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळून आले. ३५ हून अधिक कोरोना रुग्णांनी चाचणी व उपचार खाजगीत करून घेतल्यामुळे या रुग्णांची माहिती देवमाळी ग्रामपंचायतीकडे नाही. यातच देवमाळीत एका संशयित कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. यातील काही मृत्यू कोरोना संक्रमितांचे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

देवमाळी हे कोरोनाचे ‘हॉट स्पॉट’ बनत असल्याचे बघून ग्रामपंचायत प्रशासन अधिक सतर्क झाले आहेत. विनामास्क फिरणाºयांविरुद्ध कारवाई करीत शनिवारी दिवसभरात साडेतीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सरपंच पद्मा सोळंके, उपसरपंच शैलेश म्हाला, सचिव ताज पठाण, पोलीस पाटील प्रताप पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल सरोदे आणि रावसाहेबत रहाटे रस्त्यावर उतरले आहेत. कोरोनाचे गांभीर्य आणि पाळावयाच्या कोविड नियमावलीबाबत ते नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

बॉक्स

फौजदारीच्या तंबीने शिक्षक परतले

चिखलदरा तालुक्यात कार्यरत, पण परतवाड्यात वास्तव्यास असलेला एक शिक्षक कोरोना संक्रमित निघाला. त्यांना दोन दिवसांपूर्वीच बुरडघाट येथील कोविड सेंटरला ठेवले गेले. पण, तेथील अव्यवस्था बघून ते थे़ट त्या केंद्रावरून बाहेर पडले. शिक्षक पळाले म्हणून प्रशासनापर्यंत माहिती पोहचविली गेली. शिक्षकाची शोधाशोध केली गेली. परत या, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असे महसूल विभागाकडून मोबाईलवर सांगितले गेले. अखेर पळालेले शिक्षक केंद्रावर आले. कपडे व डबा आणायला ते गेले होते, असा बचावात्मक पवित्रा प्रशसनाकडून घेतल्या गेला.

---------------------

फोटो पी २२ अनिल कडू फोल्डरमध्ये

लॉकडाऊनमध्ये परतवाड्यात मटणविक्री

सोशल डिस्टनसिंगचा फज्जा, पोलिसांना बघताच ग्राहकांनी ठोकली धूम, पाच हजाराचा दंड वसूल

परतवाडा : लॉकडाऊन असले म्हणून काय झाले, रविवारी इच्छाभोजन आवश्यकच. म्हणून परतवाड्यातील मटण मार्केटमध्ये ग्राहकांची एकच गर्दी उसळली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कुणालाही मास्क नव्हता. दुकानदार ओरडून ग्राहकांना आपल्याकडील मटणाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. कोरोना वसुली पथकाला याची माहिती मिळताच पोलिसांना सोबत घेऊन पथक थेट मटन मार्केटमध्ये धडकले. तहसीलदार मदन जाधवही मटण मार्केटमध्ये दाखल झाले.

मटणविक्री करणा०या दहा दुकानदारांकडून वसूली पथकाने पाच हजारांचा दंड वसूल केला. फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तयारी असतानाच त्या दुकानदारांनी माफी मागितली. आता दुकान लागणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे फौजदारी कार्यवाहीतून त्यांना वगळल्या गेले. मटण मार्केटच्या बाहेरही काही दुकाने लागली होती.

दरम्यान, पथकाकडून केल्या जात असलेली कारवाई, पोलिसांचा ताफा व तहसीलदारांची उपस्थिती बघून अल्पावधीतच या मटण मार्केटमध्ये शुकशुकाट पसरला. मटण मार्केटमध्ये जिवंत बोकड आणि मटणविक्रीची साहित्य तेवढे तेथे शिल्लक होते. जणू काही पोलिसांनी त्या मटण मार्केटवर ताबा मिळविल्याचे दृश्य तेथे होते.

-------------

Web Title: Devmali becomes 'hot spot' due to 75 patients in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.