देवगावचा साखर कारखाना भंगारावस्थेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 05:01 IST2019-11-12T05:00:00+5:302019-11-12T05:01:10+5:30
शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला.

देवगावचा साखर कारखाना भंगारावस्थेकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव दशासर : धामणगाव तालुक्यातील एकमेव देवगाव साखर कारखान्याचा लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे अस्त झाल्याने शेकडो कामगारांचा रोजगार हिरावला. कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता बेभाव विकण्यात आली, ही तालुक्यासाठी दुर्देवी बाब आहे.
शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने धामणगावचे कै. अण्णासाहेब देशमुख यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून हक्काने साखर कारखाना मंजूर करवून घेतला. शेकडो शेतकºयांना एकत्र आणून कोट्यवधी रुपयांचे शेअर्स जमवून पैसा उभारला व परिसरात ऊसाची लागवड नसतानाही वास्तू उभी केली. परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर त्यावेळचे तत्कालिन आमदार व राज्यमंत्री यशवंतराव शेरेकर यांनी साखर कारखान्याची धुरा खांद्यावर घेतली. बाहेरून ऊस आणून लाखो पोते साखर निर्मिती केली. संचालक मंडळाने राजीनामे देऊन कारखान्यावर प्रशासक नेमण्याची पाळी आली. परिणामी कारखाना डबघाईस आला. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता.अनेकांनी यात हात धुवून घेतले.
कारखान्यातील बराच माल चोरीस गेला, काही माल पोलिसांनी जप्त केला. परंतु तो स्वीकारण्यास कोणीही पुढे आले नाही. या परिसरात अप्पर वर्धा धरणाचे पाणी आल्याने कारखान्यासाठी लागणारा संपूर्ण ऊस परिसरात उत्पादित झाला असता. लोकप्रतिनिधींनी कारखाना सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलली नाही. कारखान्यामुळे रहदारीस असलेला देवगाव चौक शांत दिसू लागला. शेतकºयांच्या आशा मावळल्या. ७ मार्च २००३ रोजी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख तळेगाव दशासर येथे आले असता आमदार वीरेंद्र जगताप यांनी प्रास्ताविकातून देवगाव साखर कारखान्याचा गंभीर प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. परंतु आश्वासनपूर्ती झाली नाही.
सदर कारखाना शासनाने अवसायनात काढून विक्रीस काढला. सदर कारखान्याची मालमत्ता विक्रीची निविदा मागविण्यात आली व त्यावेळच्या १२ कोटी रूपयांच्या कारखान्याची मालमत्तेची किंमत फक्त ३ कोटी रुपये ठेवण्यात आली. त्यात भंगारवाल्यांनी फक्त ८५ लाखांत मागणी केली. शासनाने तेथील यंत्राची किंमत ३ कोटी ६० लाख रुपये ठेवली असताना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील शरद सहकारी साखर कारखान्याने निविदेनुसार तीन कोटी सात लाख रुपयांची निविदा भरल्याने त्यांना देवगाव साखर कारखान्याची यंत्रे विकण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकाºयांनी दिल्यानुसार पैठण शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार चंद्रकांत घोडके यांना देण्यात आले. त्यांना देवगाव शेतकरी साखर कारखान्यावर सुरक्षा नेमण्याविषयी पत्र देण्यात आले. या पत्राचे संदर्भानुसार साखर आयुक्त पुणे यांचे पत्र शेतकरी साखर कारखाना देवगाव या साखर कारखान्याची मशिनरी विक्रीबाबतचे १८ जून २००६ रोजी पत्र प्राप्त झाले.