५५५ अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये १६ कोटींची विकासकामे
By Admin | Updated: July 12, 2014 00:41 IST2014-07-12T00:41:14+5:302014-07-12T00:41:14+5:30
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला सन २०१३-१४ साठी अनुसूचित जातीच्या वस्तीचा विकास करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे.

५५५ अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये १६ कोटींची विकासकामे
अमरावती : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाला सन २०१३-१४ साठी अनुसूचित जातीच्या वस्तीचा विकास करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. यामधून जिल्ह्यातील १५५ अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत.
सामाजिक न्याय विभागाने जिल्हा परिषद, समाजकल्याण विभागाला चौदाही तालुक्यांतील अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी १५ कोटी ८९ लाख ७७ हजार १७६ रुपयांचा निधी सन १३-१४ च्या आर्थिक वर्षात मंजूर केला होता. या निधीमधून अमरावती तालुक्यात ३९, भातकुली २७, नांदगाव खंडेश्वर ७८, चांदूररेल्वे ३६, धामणगाव रेल्वे २८, तिवसा ३४, मोर्शी ३४, वरुड ३५, चांदूरबाजार ६१, अचलपूर ४१, धारणी १८, चिखलदरा १३, अंजनगाव सुर्जी ३९ आणि दर्यापूर ७२ अशा ५५५ अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये विकासकामे केली जाणार आहे. यामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता, सिमेंट काँक्रीट नाली, सौर पथदिवे, महिला शौचालय, समाज मंदिर आदी विकासकामांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने प्रशासकीय मंजुरात मिळालेल्या ४६९ कामांसाठीचा १४ पंचायत समितीला ६० टक्के निधी दिला आहे. यापैकी काही कामे सुरु झाली असून उर्वरित कामेही त्वरित सुरू केली जाणार आहे.