आचारसंहितेमुळे ८४० ग्रामपंचायतींत विकासकामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:10 IST2020-12-26T04:10:55+5:302020-12-26T04:10:55+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आदर्श आचारसंहितेमुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे. जवळपास ...

आचारसंहितेमुळे ८४० ग्रामपंचायतींत विकासकामांना ब्रेक
अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात आदर्श आचारसंहितेमुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे. जवळपास एक महिना ही कामे खोळंबून पडणार आहेत. यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे सर्वच कामांची प्रक्रिया ठप्प झाली होती. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आटोपताच ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे रस्ते डांबरीकरण, रस्ते दुरुस्ती, समाज मंदिर, संरक्षक भिंत, अंगणवाडी, प्राथमिक केंद्र, शाळा इमारत बांधकाम, गटार दुरुस्ती, रस्ता मुरमीकरण, दुरुस्ती, पूल, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे जलसंधारणासाठी अनेक कामांना आचारसंहितेमुळे ब्रेक लागला आहे.
बॉक्स
दर्जेदार कामांबाबत शंकाच
आचारसंहितेमुळे जिल्ह्यातील विकासकामांत सातत्याने अडथळे येत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर अनेक विकासकामे तसेच चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाच्या आमदार आणि खासदार निधीतून मंजूर कामे खोळंबली आहेत. शासनाकडून निधी आला असला तरी हा निधी मार्चपूर्वी संपविण्याचे आदेश आहेत. त्यामुळे कामे दर्जेदार होणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता किमान निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे कामे पूर्ण करण्यासाठी दोनच महिने मिळणार आहेत.