निधीअभावी रखडला शेंडगावचा विकास आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST2019-12-19T06:00:00+5:302019-12-19T06:00:33+5:30
शेंडगाव ही गाडगेबाबांची जन्मभूमी आहे, तर ऋणमोचण ही कर्मभूमी आहे. वलगाव ही निर्वाणभूमी आहे, तर समाधीस्थळ गाडगेनगर येथे आहे. गाडगेबाबांचा जन्म झाल्यानंतर गाडगेबाबा लहानपणी काही वर्षे शेंडगावात आईसोबत येथे वास्तव्याला होते. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथे आईसमवेत मामाकडे आसरा घेतला.

निधीअभावी रखडला शेंडगावचा विकास आराखडा
संदीप मानकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्मयोगी संत गाडगेबाबांचे जन्मस्थळ असलेल्या अंजनगाव तालुक्यातील शेंडगाव येथील १८.५९ कोटींचा ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखडा निधीअभावी रखडला आहे.
तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पाठविलेला गाडगेबाबांच्या अर्धाकृती पुतळा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बसविण्यात आला होता. सदर विकास आराखड्याला शासनाने मे २०१९ ला प्रशासकीय मंजुरीही दिलीे. मात्र, यावर निधीची कुठलीही तरतूद करण्यात न आल्याने सदर विकास आराखडा रखडला आहे.
शेंडगाव ही गाडगेबाबांची जन्मभूमी आहे, तर ऋणमोचण ही कर्मभूमी आहे. वलगाव ही निर्वाणभूमी आहे, तर समाधीस्थळ गाडगेनगर येथे आहे. गाडगेबाबांचा जन्म झाल्यानंतर गाडगेबाबा लहानपणी काही वर्षे शेंडगावात आईसोबत येथे वास्तव्याला होते. पण, वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा येथे आईसमवेत मामाकडे आसरा घेतला.
ज्या गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्रात समाजप्रबोधनातून, कीर्तनातून लोकांमध्ये जनजागृती केली, लोकांच्या मनातील घाण साफ केली, स्वच्छतेचा संदेश दिला, गरिबांसाठी राज्यभर अनेक ठिकाणी अनाथाश्रम, आश्रम शाळा काढल्या, त्याच गाडगेबाबांच्या जन्मस्थळाचा विकास शासन गेल्या अनेक वर्षांपासून करू शकले नाही. इतर राज्यातील पर्यटकांनासुद्धा नेहमीच शेंडगावचे आर्कषण राहते. परंतु, या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाहीत. त्यामुळे शेंडगावात ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी येथे भेट देऊन निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय मंजुरी मिळाली; मात्र निधीची तरतूद झाली नाही. यंदाच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेंडगावाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी शेंडगाव येथील नागरिकांची अपेक्षा आहे. त्याकरिता दर्यापूरचे नवनिर्वाचित आमदार बळवंत वानखडे यांनी पुढाकार घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे. शासनाने १८ एकर जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केली असून, विकास आराखड्यामध्ये सभागृह, भक्तनिवास, गाडगेबाबांचे स्मृतिकेंद्र, बगीचा व इतर कामांचा समावेश आहे. भुलेश्वरी नदीच्या तिरी वसलेल्या शेंडगावात विकास आराखडा पूर्ण झाल्यास देशभरातून पर्यटक येतील, अशी अपेक्षा आहे.