देऊतवाडा रेती घाटावर रेतीतस्कराचा महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:12 IST2021-04-22T04:12:59+5:302021-04-22T04:12:59+5:30

दोन दुचाकींची तोडफोड, १२ पसार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल, पोलिसांकडून शोध सुरू वरूड :- तालुक्यात देऊतवाडा येथे गस्तीवर गेलेल्या महसूल ...

Deutwada Sand Ghat Deadly Attack on Sand Revenue | देऊतवाडा रेती घाटावर रेतीतस्कराचा महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

देऊतवाडा रेती घाटावर रेतीतस्कराचा महसूल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

दोन दुचाकींची तोडफोड, १२ पसार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल, पोलिसांकडून शोध सुरू

वरूड :- तालुक्यात देऊतवाडा येथे गस्तीवर गेलेल्या महसूल पथकावर रेती तस्करांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटे साडेतीन वाजता घडली. यामध्ये एक तलाठी गंभीर जखमी, तर तीन किरकोळ जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पसार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सूत्रांनुसार, महसूल पथकातील तलाठी चेतन चकोले गंभीर जखमी झाले आहेत. योगेश बुराळ , रमेश मारग , केवलसिंह गोलवाल , कोतवाल नागेश कनाठे यांना किरकोळ जखमा आहेत. शिवा शिवहरे, योगेश गुल्हाने, सुरेंद्र भुयार, सचिन थोटे, आशिष शेळके, महेंद्र चौधरी (सर्व रा . राजुराबाजार) व सहा अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. तत्पूर्वी, बुधवारच्या पहाटे साडेतीन वाजता देऊतवाडा रेतीघाटावर महसूल पथकचे चार कर्मचारी एमएच ३४ बीडब्ल्यू ९४४१ व एमएच २७ सीक्यू ९०९४ क्रमांकाच्या दुचाकींनी गेले होते. रेती तस्करांनी धारदार वस्तूंनी त्यांच्यावर हल्ला केला व दोन्ही दुचाक्यांची तोडफोड केली.

तलाठी चेतन चकोले यांचे डोक्यावर गंभीर दुखापत होऊन नऊ टाके पडले. सर्व जखमींना तहसीलदार किशोर गावंडे, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी यांनी पहाटेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तसेच आरोपच्च्या अटकेच्या सूचना पोलिसांना केल्या. तलाठी केवलसिंह गोलवाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३५३ , ३०७ , ३४ , १४३ ,१४७ , १४८ अन्वये गुन्हा दाखल केला.

ठाणेदार प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक हेमंत चौधरी, उपनिरीक्षक हिवसेंसह वरूड पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत आहे. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कर्मचाऱ्यांची भेट घेतली तसेच रेती तस्करांवर कारवाईचे आदेश दिले.

-------------------

महसूल कर्मचारी आणि पटवारी संघटनेचा निषेध

रेटीतस्करांनी महसूल पथकावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेचा तीव्र निषेध करून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी अध्यक्ष प्रमोद राऊत यांनी केली. याप्रसंगी मंडळ अधिकारी, तलाठी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले.

Web Title: Deutwada Sand Ghat Deadly Attack on Sand Revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.