पालकमंत्र्यांसह देशमुखांनी वाढविला पदाधिकाऱ्यांचा उत्साह

By Admin | Updated: March 10, 2017 00:21 IST2017-03-10T00:21:24+5:302017-03-10T00:21:24+5:30

तब्बल १९ वर्षानंतर महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि .....

Deshmukh boosts office bearers with Guardian Minister | पालकमंत्र्यांसह देशमुखांनी वाढविला पदाधिकाऱ्यांचा उत्साह

पालकमंत्र्यांसह देशमुखांनी वाढविला पदाधिकाऱ्यांचा उत्साह

खुल्या जीपमधून मिरवणूक : ढोल-ताशांच्या निनादात विजयोत्सव
अमरावती : तब्बल १९ वर्षानंतर महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आ.सुनील देशमुख यांनी गुरूवारी महापालिकेत उपस्थित राहून नवनियुक्त महापौर, उपमहापौरांसह पदाधिकारी व नगरसेवकांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकाभिमुख निर्णयामुळे भाजपला निर्भेळ यश मिळाल्याचे सांगत उभय नेत्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पारदर्शक कारभाराचा मूलमंत्र दिला. महापालिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपण महापालिकेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
फुगडी खेळून विजयोत्सव
अमरावती : पालकमंत्री पोटे यांनी थेट सभागृह गाठून नरवणे आणि टिकले यांच्यासह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. महापौरांच्या कक्षात उभय नेत्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तथा त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी महापौर मिलिंद चिमोटे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, शहराध्यक्ष जयंत डेहणकर, किरण पातुरकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
एकतर्फी विजयश्री मिळवून महापौरपदी विराजमान झालेले संजय नरवणे आणि नवनिर्वाचित उपमहापौर संध्या टिकले यांची महापालिका आवारात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. भाजपक्षाचे सर्व नगरसेवक त्यात उत्साहाने सहभागी झाले. त्यानंतर एका सजविलेल्या खुल्या जिपमधून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी ४ वाजेपर्यंत हा विजयी जल्लोष सुरु होता. राजकमल चौकातून सुरु झालेली ही विजयी रॅली राजापेठ व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणाहून मिरविण्यात आली. महापालिकेत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याशिवाय महापालिका सभागृहाजवळ ‘मेटल डिटेक्टर’ ठेवण्यात आले होते. तेथे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून तपासणी करण्यात आली. दरम्यान भाजपच्या महिला सदस्यांनी महापालिकेच्या आवारात फुगड्या खेळून विजयोत्सव साजरा केला.

Web Title: Deshmukh boosts office bearers with Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.