शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

ग्रामस्थांचा निर्धार,‘सारे बोलोे एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 1:26 AM

‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जल संधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बुधवारी श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.

ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धा : जिल्हाधिकाऱ्यांच्या श्रमदानातील सहभागाने वाढला नागरिकांचा उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जल संधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बुधवारी श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी माणिकपूरमध्ये गत पंधरवड्यात सलग समतल चर, माती बांध, दगडी अनगळ बांध आदी जलसंधारणाची कामे ग्रामस्थांनी श्रमदानातून सुरू केली आहेत. काही कामे पूर्णही झालीत. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने पाझर तलावातील गाळ काढणे व इतर कामांसाठी यंत्र पुरविण्यात आले.जिल्हाधिकारी अभिजित बांगर हे बुधवारी पहाटेच सहकाºयांसह माणिकपूर येथे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पोहोचले. त्यांनी स्वत: कुदळ व फावडे घेऊन सर्वांसह चर खणण्याच्या व दगड माती उचलून श्रमदान केले. त्यामुळे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. उपविभागीय अधिकारी योगेश कुंभेजकर, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश काळे, तहसीलदार आशिष बिजवल व विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही श्रमदान केले. जलसंधारणाच्या कामातून माणिकपूर गावातील जलस्त्रोतांचे पुनर्भरण होऊन एक कोटी लाख लीटरहून अधिक पाणी उपलब्ध होणार आहे. पाझर तलावातील गाळ काढल्यामुळे तेथेही अधिक पाणी साठवण होण्यास मदत होईल. झटांगझिरी येथील कामातून डोंगरावरील माती धरणात वाहून जाणे थांबेल व भूजल पातळी वाढेल. गावकऱ्यांनी जलसंधारणातून गावाच्या कायापालटाचे उद्दिष्ट समोर ठेवून श्रमदान करावे व प्रशासनानेही अधिक लोकसहभाग मिळवून कामे पूर्ण करावी, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.भारतीय जैन संघटनेचाही सहभाग‘जल है तो कल है’ अशा घोषणा ज्ञानेश्वरी शिरसाम या चिमुकल्या बालिकेसह सर्व आबालवृद्ध देत होते. झटांगझिरी गावातही समतल सलग चर, अनगड दगडी बांध आदी कामांमध्ये जिल्हाधिकारी व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले. दगड वाहून नेण्याच्या कामासाठी मानवी साखळीही उभारण्यात आली होती. यामध्ये सरपंच वंदना गुर्जर, भारतीय जैन संघटनेचे सुनील जैन, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक अतुल काळे, तालुका समन्वयक उज्ज्वल कराळे, हरीश खासबागे, चौधरी यासह गावकºयांनी श्रमदानात सहभाग घेतला.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा