मृत्यूच्या दाखल्यासाठी वणवण, वृद्धाचा मृत्यू
By Admin | Updated: March 16, 2015 00:15 IST2015-03-16T00:15:11+5:302015-03-16T00:15:11+5:30
पत्नीच्या मृत्युच्या दाखल्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे घेताना ग्रामसेवकाने केलेल्या अरेरावीमुळे वागणुकीमुळे प्रकृती बिघडल्याने वृध्दाचा मृत्यू झाला.

मृत्यूच्या दाखल्यासाठी वणवण, वृद्धाचा मृत्यू
वरुड : पत्नीच्या मृत्युच्या दाखल्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे घेताना ग्रामसेवकाने केलेल्या अरेरावीमुळे वागणुकीमुळे प्रकृती बिघडल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. यासाठी संबंदित ग्रामसेवकालाच जबाबदार धरून मृत वृध्दाच्या मुुलासह नातलगांनी मृतदेह वरूड पोलीस ठाण्यात आणून ग्रामसेवकाला अटक करण्याची मागणी लावून धरली. परिणामी परिसरात तणाव निर्माण झाला होता.ही घटना १३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजताच्या दरम्यान घडली.
विष्णू रामराव चव्हाण (८०) असे मृत वृध्दाचे नाव आहे. मोरचूद ग्रामपंचायत कार्यालयात पत्नीच्या मृत्युचा दाखला घेण्यासाठी ते अनेक दिवसांपासून चकरा मारत होते. त्यात ग्रामसेवकाने मालमत्ता कर भरा आणि नंतरच दाखला मिळवा, अशी धमकी दिल्याने विष्णू चव्हाण यांनी धसका घेतला होता. खंडाते नामक ग्रामसेवकाच्या वर्तणुकीनंतर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना राजुरा बाजार येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला.