कृउबासचे उपसभापती यांचे उपोषण सुरू

By Admin | Updated: March 4, 2017 00:12 IST2017-03-04T00:12:11+5:302017-03-04T00:12:11+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल शेतकऱ्यांच्या तुरी बाजार समितीत पउून आहेत.

The Deputy Speaker of Krishubas started the fast | कृउबासचे उपसभापती यांचे उपोषण सुरू

कृउबासचे उपसभापती यांचे उपोषण सुरू

नाफेड तूर खरेदी बंद : सुरू करण्याचा मुद्दा तापला
चांदूररेल्वे : कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने शेकडो शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल शेतकऱ्यांच्या तुरी बाजार समितीत पउून आहेत. गोडावून उपलब्ध करूनही नाफेडने गोडाऊन नापसंत केल्यने विविध पत्रव्यवहार, बैठका, निवेदन, चर्चा गेल्या दहा दिवसात शासकीय स्तरावर पार पडल्या परंतु नाफेडचे अधिकारी व विदर्भ को मा. सोसायटी द्वारा शेतकऱ्यांची दरवळ घेतली नाही. अखेर चांदूररेल्वे बाजार समितीचे उपसभापती अशोकराव चौधरी यांनी तहसील कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांसमवेत ३ मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले. उपोषण मंडपात आ.वीरेंद्र जगताप, जि.प. सदस्य, बाजार समितीचे पदाधिकारी, नायब तहसीलदार, सहायक निबंधक यांनी भेट देऊन चर्चा केल्या. जोपर्यंत बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी सुरू होणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार या वेळी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला. शासन स्तरावर मुख्यमंत्र्यांपासून पणन मंत्री, पालकमंत्रींशी बोलताना १५ एप्रिलपर्यंत तूर खरेदी सुरू राहील, असे सांगितले. दुसरीकडे चांदूररेल्वेची तूर खरेदी बंद असल्याने याकडे सर्वांचे दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे. (तालुका प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
आ.वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ना. प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांचेशी चर्चा केली. चांदूररेल्वे बाजार समितीत नाफेडद्वारे तूर खरेदी तत्काळ सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. याप्रसंगी संदीप वाघ, आरेकर, सुनील गावंडे, बगाडे व शेतकऱ्यांनी सत्य परिस्थितीचे विश्लेषण केले. पण प्रत्यक्ष तूर खरेदी सुरू झाल्यानंतर चर्चेचे फलित होईल, अशी चर्चा प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: The Deputy Speaker of Krishubas started the fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.