दर्यापुरात वंचित बहुजन आघाडीचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:12 IST2021-03-07T04:12:36+5:302021-03-07T04:12:36+5:30
स्थानिक मागण्यांचाही समावेश : ते कायदे रद्द करा दर्यापूर : केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी ...

दर्यापुरात वंचित बहुजन आघाडीचे धरणे
स्थानिक मागण्यांचाही समावेश : ते कायदे रद्द करा
दर्यापूर : केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी व ते शेती कायदे रद्द करावे, या मागणीसाठी दर्यापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील डोंगरगाव, मार्कंडा व टाकरखेडा कावरे या गावाला शहानूर योजनेचे पाणी मिळावे, दर्यापूर शहरातील अपुरे असलेले काँक्रीटीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे, थिलोरी ते गणेशपूर रोडवरील पुलाचे बांधकाम करावे, गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझेलचे वाढलेले दर कमी करावे, राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करावी, या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव साहेबराव वाकपांजर, जिल्हा उपाध्यक्ष अतुल नळकांडे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष अंकुश वाकपांजर, बाळकृष्ण अभ्यंकर, मुरलीधर रायबोर्डे, सुरेंद्र तायडे, संतोष बगाडे, शुभम वाकपाजर, चंदू रायबोले, देवराव वाकपांजर, पूरण डोंगरे, सुरेश डोंगरे, धनराज भिसे, गौतम डोंगरे, सुमेध इंगळे, संजीवन खंडारे, प्रीतम नितोने यात सहभागी होते.