शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Video : ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा जयघोष; आमदार रवी राणांनी वारकऱ्यांसोबत घातली फुगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2022 16:26 IST

वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.

ठळक मुद्देअंबानगरीत रुक्मिणीमातेच्या पालखीचे भव्य स्वागत

अमरावतीविदर्भातील ४२७ वर्षांची परंपरा असलेल्या श्री रुक्मिणीमातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तत्पूर्वी या पायदळ दिंडी पालखीचे सोमवारी सायंकाळी अमरावतीत आगमन झाले. यावेळी, शहरातील विविध ठिकाणी जल्लोषात पालखीचे स्वागत करण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या हस्ते राजापेठ चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. राणांनी पूजन करून हनुमान चालीसा वाटप केली. यावेळी वारकऱ्यांनी फुगडीवर ताल धरला होता. आमदार राणांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूर येथील रुक्मिणीमातेची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. मागील ४२८ वर्षांपासून ही पालखी दरवर्षी पंढरपूरला जात असते. दरम्यान, सोमवारी अमरावती येथे दाखल झालेल्या दिंडीचे राजापेठ मुख्य चौकात आमदार रवी राणा व युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी माता रुक्मिणीच्या पालखीचे भव्य स्वागत करून आशीर्वाद घेतले. शेतकरी बांधवांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने हजेरी लावावी, अशी मनोकामना रवी राणा यांनी केली. 

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांकडून पूजन

शहरातील बियाणी चौकातही फटाक्यांची आतषबाजी तसेच टाळमृदुंगाच्या गजरात पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, राजराजेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी पालखीपूजन व वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री रामचंद्र युवक कल्याण संस्थेच्या वतीने तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. पालखीच्या स्वागतानिमित्त बियाणी चौकात व्यासपीठ उभारण्यात येऊन श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यासभोवती फुलांच्या माळा, रांगोळ्या, स्वागत फलकांनी संपूर्ण चौक सुशोभित करण्यात आला होता. वारकरी व भाविकांनी ‘रुक्मिणीवल्लभ कृष्ण हरी’चा एकच जयघोष केला. यावेळी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंगाच्या साथीने आसमंत निनादून गेले होते.

प्रत्येक भाविकाला पालखीचे व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी चौकाच्या मधोमध उभारलेल्या व्यासपीठावर पालखी थांबवून भाविकांना पूजन व दर्शनाची सोय करून देण्यात आली. कोविड साथीमुळे दोन वर्षांच्या निर्बंध संपल्यानंतर मुक्त वातावरणात पालखीचे अंबानगरीत आगमन झाल्यामुळे वारकरी बांधवांमध्ये उत्साह संचारला होता. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे निघालेल्या पायदळ दिंडी पालखीच्या दर्शनासाठी शेकडो अमरावतीकर उपस्थित होते.  

टॅग्स :SocialसामाजिकRavi Ranaरवी राणाAmravatiअमरावती