विभागीय लोकशाही दिनात १० प्रकरणे

By Admin | Updated: December 15, 2015 00:20 IST2015-12-15T00:20:47+5:302015-12-15T00:20:47+5:30

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपायुक्त (रोहयो व सामान्य प्रशासन) लहुराज माळी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज सोमवारी करण्यात आले.

Departmental Democracy Day 10 cases | विभागीय लोकशाही दिनात १० प्रकरणे

विभागीय लोकशाही दिनात १० प्रकरणे

सूचना : तत्काळ निकाली काढा
अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपायुक्त (रोहयो व सामान्य प्रशासन) लहुराज माळी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज सोमवारी करण्यात आले. विभागातून लोकशाही दिनासाठी १० प्रकरणे दाखल करण्यात आलीत. या प्रकरणावर योग्य कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कार्यवाहीच्या अहवालाची प्रत तक्रारकर्त्यांस देण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी बैठकीत दिलेत. सादर करण्यात आलेल्या प्रकरणांपैकी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांचेशी संबंधित चार प्रकरणे, कृषी विभाग अमरावती एक प्रकरण, मनपा अमरावती एक प्रकरण, मुख्य वनसंरक्षक वनविभाग एक प्रकरण, जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा एक प्रकरण व जिल्हा परिषद अमरावती दोन प्रकरणे अशी एकूण दहा प्रकरणे तहसीलदार वैशाली पाथरे यांनी कामकाजासाठी सादर केलीत. यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) एस.व्ही. शिरसुध्दे, यवतमाळचे उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, प्र. उपसंचालक भूमी अभिलेख आर. जी. लाखाडे, विभागीय उपनिबंधक किरण गायकवाड, महापालिकेचे कार्यकारी अभियंता आर.एम. पवार, जलसंपदाचे अंबारखाने, बांधकाम विभागाचे शेरेकर उपस्थित होते.

Web Title: Departmental Democracy Day 10 cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.