चिखलदऱ्यात दाट धुके, दमदार पाऊस
By Admin | Updated: January 1, 2015 22:53 IST2015-01-01T22:53:33+5:302015-01-01T22:53:33+5:30
विदर्भाचे नंदनवन असे संबोधल्या जाणाऱ्या चिखलदरा या पर्यटनस्थळी नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची नगण्य उपस्थिती होती.

चिखलदऱ्यात दाट धुके, दमदार पाऊस
पर्यटकांची पाठ : नववर्षाचे स्वागत थंडीने
चिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असे संबोधल्या जाणाऱ्या चिखलदरा या पर्यटनस्थळी नववर्षाच्या स्वागताला पर्यटकांची नगण्य उपस्थिती होती.
बुधवारपासून सुरू असलेल्या पावसाची २४ तासांत १२५ मि.मी. एवढी नोंद झाली असून धुक्यात पर्यटन नगरीचा नजारा दिलखेचक ठरला आहे.
चिखलदऱ्यात बुधवारी सायंकाळपासून संततधार पावसाला सुरूवात झाली. या अनपेक्षित मुसळधार पावसामुळे पर्यटकांचा ओघ मंदावला. सरत्या वर्षाला अलविदा करण्यासाठी पर्यटन नगरी सज्ज असताना येथील व्यावसायिकांची कधी नव्हे ती निराशा झाली. (तालुका प्रतिनिधी)
आल्हाददायी वातावरण
चिखलदरा पर्यटन स्थळावर २४ तासात १२५ मि. मी. पावसाची नोंद झाली. १ जानेवारी रोजी मात्र पर्यटन स्थळावरील रस्ते सुनसान होते. दाट धुक्यामुळे वाहन चालकांना दिवसा सुद्धा लाईट लावून वाहन चालवावे लागले तर तालुक्यातील चुरणी येथे १०० मि. मी. टेंब्रुसोंडा ७०, सेमाडोह येथे ७२ मि. मी. पावसाची नोंद झाली. झालेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे.