शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

डेंग्यूचा प्रकोप कायम, तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यू आजाराने अख्खे शहर कवेत घेतल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी आ. रवि राणा यांनी डेंग्यू रुग्णांची भेट घेऊन महापालिका प्रशासनास खडेबोल सुनावले. शहरात तूर्तास ५०० पेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून, पैकी तिघांचा या आजाराने मृत्यू झाला, असे बजावत महापालिका प्रशासन आणखी किती जीव घेणार, असा सवाल ...

ठळक मुद्देरवि राणांनी घेतली रुग्णांची भेट : महापालिका अधिकाऱ्यांना खडसावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : डेंग्यू आजाराने अख्खे शहर कवेत घेतल्याच्या पार्श्वभूमिवर शनिवारी आ. रवि राणा यांनी डेंग्यू रुग्णांची भेट घेऊन महापालिका प्रशासनास खडेबोल सुनावले. शहरात तूर्तास ५०० पेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असून, पैकी तिघांचा या आजाराने मृत्यू झाला, असे बजावत महापालिका प्रशासन आणखी किती जीव घेणार, असा सवाल त्यांनी थेट आयुक्त संजय निपाणे यांना केला.आ. रवि राणा यांनी शनिवारी दुपारी मनपा आयुक्त संजय निपाणे, नगरसेवक ऋषी खत्री, माजी नगरसेवक प्रमोद पांडे व अंजली पांडे, सुमित डहाणे यांनी डेंग्यूने जीव गमावलेल्या परिवारांसह डेंग्यूबाधितांच्या भेटी घेतल्या. त्यांच्या घरीसुद्धा भेटी देऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. या भेटीमुळे भयानक परिस्थिती समोर आली आहे. ही बाब आयुक्त संजय निपाणे यांनी मान्य केली. आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना आ. राणा यांनी डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत धारेवर धरले. महापालिकेच्या उशिरा झालेल्या उपाययोजना रुग्णांच्या जीवावर उठल्या आहेत.आपण याबाबत महापालिकेला आधीच सूचित केले होते. मात्र, ते गांभीर्याने न घेतल्याने शहरात ५०० पेक्षा अधिक रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे राणा म्हणाले. मनपा आयुक्त संजय निपाणे यांची काम करण्याची प्रामाणिक इच्छा दिसून येत असताना मुळात त्यांच्या हाताखालील अधिकारी, कर्मचारी आरोग्य विभागच त्यांना साथ देत नसल्याचे आ. रवि राणा म्हणाले. या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या आ. रवि राणा यांनी मनपा आयुक्तांसह उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांना धारेवर धरले. एकीकडे प्रशासनाच्या पातळीवर अनागोंदी असताना दुसरीकडे मनपातील अधिकारी, कर्मचारी अनेक नगरसेवकांचा साधा फोनही न उचलण्याच्या तक्रारी यावेळी नागरिकांनी आ. रवि राणा व उपस्थित वरिष्ठ अधिकाºयांकडे केल्या. यावेळी नरेंद्र वानखडे, अजय मोरय्या, संदीप गुल्हाने, लक्ष्मण लाठेकर, मालाणी, नंदलाल खत्री, कमल मालाणी, सुनील तरडेजा, अमर तरडेजा आदी उपस्थित होते.जिल्ह्यात डेंग्यूचे आणखी सात रुग्णअमरावती : जिल्ह्यात ‘डेंग्यू’ आजाराचे पुन्हा सात रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. डेंग्यूची साथ रोखण्यास महापालिका व जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनाला अद्यापही यश आलेले नाही. रोज कुठेना कुठे रुग्ण आढळून येत आहेत. तीन ते चार दिवसांत खासगी डॉक्टरांकडे डेंग्यूचे २६ रूग्ण आढळले. शुक्रवारी सांयकाळी व शनिवारी दिवसभर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने जेथे पावसाचे पाणी साचेल, तेथे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. राठी नगरातील डॉ. नितीन सोनोने यांच्याकडे डेंग्यूचे तीन रूग्ण आढळले. यामध्ये शेगाव नाका परिसरातील २० वर्षीय तरूण, भातकु ली तालुक्यातील ४० वर्षीय महिला व राठीनगर अमरावती येथील २५ वर्षीय महिला डेंग्यू आजाराने बाधित असून, डेंग्यूचे निदान करणाºया चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे. डॉ. राजेश मुंदे यांच्या हॉस्पिलमध्ये आणखी डेंग्यूचे तीन रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आहे. तर एक रूग्ण ‘स्क्रब टायफस’चे आढळुन आले आहेत. डेंग्यूमध्ये स्वास्तिक नगरातील ५८ वर्षीय महिला, रवीनगरातील २८ वर्षीय तरूण, साईनगरातील २४ वर्षीय महिलेवर उपचार सुरू आहे. यादगिरे हॉस्पिटलमध्येही डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे.स्क्रब टायफसच्या रूग्णाला नागपूरला हलविलेस्क्रब टायफस या आजाराने ग्रस्त नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक ३६ वर्षीय पुरूष रुग्ण उपचारासाठी राजापेठ येथील डॉ. राजेश मुंदे यांच्याकडे दाखल झाला होता. त्याच्या छातीवर कीटक चावल्याची निशाणसुद्धा होती. रुग्ण गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलविण्यात आल्याचे डॉ. राजेश मुंदे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ‘स्क्रब टायफस’चे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.-तर टाळता आली असती साथवेळीच रस्त्यावर उतरून साफसफाईसह फॉगिंग व फवारणी करणाºया आ. रवि राणा यांचा इशारा वेळीच लक्षात घेतला असता, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती व नागरिकांना मरण यातना सोसाव्या लागल्या नसत्या, अशी प्रतिक्रिया उमटली आहे. आज महानगरातील जनता मनपाच्या नावाने देवा-देवा करीत असल्याचे दिसून येत आहे.