धामणगाव शहराला डेंग्यूचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST2021-07-10T04:09:58+5:302021-07-10T04:09:58+5:30
धामणगाव रेल्वे : आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून, मागील वर्षापेक्षा ही लागण दुपटींनी वाढली आहे. धामणगाव तालुक्यात कधी ...

धामणगाव शहराला डेंग्यूचा विळखा
धामणगाव रेल्वे : आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले असून, मागील वर्षापेक्षा ही लागण दुपटींनी वाढली आहे.
धामणगाव तालुक्यात कधी वाढते तापमान, तर कधी थंड गारवा असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच १० दिवस पावसाचा खंड पडल्याने मध्यंतरी नगरपरिषदेने नाल्या व परिसराची साफसफाई केली असली तरी काही भागात घरातील पाण्याच्या टाक्या, कुंड्य़ा, करवंट्य़ा, रबरी टायर, फुलदाण्या, कूलर्समध्ये पाणी साठल्यामुळे डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली आहे. यामध्ये २ ते १४ वर्षे वयाचे रुग्ण अधिक असून, शहरातील खासगी रुग्णालयात अचानक गत आठवड्यात गर्दी वाढली आहे.
बॉक्स
ही आहेत लक्षणे
तापाचे कमी अधिक प्रमाण, कातडीवर रक्ताळलेले पुरळ, रक्तस्राव झोप अधिक लागणे, अपभ्रंश, दम लागणे, सतत उलट्य़ा, पोटदुखी, अंगावर सूज, शरीर थंड पडणे, रक्तदाब कमी होणे आदी लक्षणे डेंग्यूची आजाराची आहेत. तालुक्यात १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये हा प्रकार अधिक प्रमाणात आढळत आहे.
शिवाजी चौक, लुनावतनगर बनलेय ‘हॉटस्पॉट‘
धामणगाव शहरातील पूर्वी बुधवार बाजार मेन लाईन येथे अनेक भाजीपाला, फळ विक्रेत्यांची दुकाने राहत होती. आता ही दुकाने सर्वोदय कॉलनी लुनावतनगर परिसरातील, शिवाजी चौकात आली आहेत. अनेक भाजीविक्रेते व फळविक्री केल्यानंतर सडका भाजीपाला परिसरातील नालीत ढकलून देतात. या नाल्याची साफसफाई होत नसल्याने तेथे अधिक डेंग्यूचा धोका वाढला आहे. त्यामुळे या भागातील भाजीपाला विक्रेत्यांना दररोज परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी दिले आहे.
कोट
प्रशांत उरकुडे,
मुख्याधिरी, धामणगाव रेल्वे