जिल्ह्यात पाच जणांना डेंग्यूचा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:14 IST2021-03-23T04:14:12+5:302021-03-23T04:14:12+5:30
जिल्ह्यात हिवताप अधिकारी कार्यालयांतर्गत विविध कर्मचाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागात डेंग्यू तपासणीकरिता जानेवारी ते मार्च दरम्यान ११० रक्तजल नमुने ...

जिल्ह्यात पाच जणांना डेंग्यूचा डंख
जिल्ह्यात हिवताप अधिकारी कार्यालयांतर्गत विविध कर्मचाऱ्यांनी शहरी व ग्रामीण भागात डेंग्यू तपासणीकरिता जानेवारी ते मार्च दरम्यान ११० रक्तजल नमुने गोळा केले. ते बॅक्टेरिया परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्याअंतर्गत शहरातील एकाचा आणि ग्रामीण भागातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच जिल्ह्यात जानेवारी ते मार्च दरम्यान मलेरिया संशयित भागातून ५५ हजार स्लाईड्स तपासणीकरिता पाठविण्यात आल्या होत्या. त्यात केवळ एकच रुग्ण मलेरियाग्रस्त आढळून आला असून, उपचाराअंती त्याची प्रकृती सुधारल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
-----
कोट
जानेवारी ते मार्च दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे ११० रक्तजल नमुने आणि ५५ हजार स्लाईड्स मलेरिया तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविल्या. त्यात पाच डेंग्यू आणि एक मलेरियाचा रुग्ण आढळून आला. उपचाराअंती ते बरेही झाले आहेत.
- शरद जोगी,
जिल्हा हिवताप अधिकारी