नांदगावात किसान सभा व शेतमजूर युनियनची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:13 IST2021-07-28T04:13:07+5:302021-07-28T04:13:07+5:30
नांदगाव खंडेश्वर : शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनांतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे ...

नांदगावात किसान सभा व शेतमजूर युनियनची निदर्शने
नांदगाव खंडेश्वर : शेतकरीविरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी आंदोलनांतर्गत नांदगाव खंडेश्वर येथे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती रामनाथ कोविंद व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना तहसीलदार नांदगाव खंडेश्वर यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन तालुका शाखा नांदगाव खंडेश्वरच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाकपचे राज्य सचिव तुकाराम भस्मे, शेतमजूर युनियनचे विभागीय संपर्कप्रमुख संजय मंडवधरे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सुनील मेटकर, संतोष सुरजुसे, गणेश अवझाडे, सतीश शिंदे, विनोद तरेकर, भानुदास मंदुरकर, रवींद्र तलवारे, बाबाराव इंगळे, हरिदास देशमुख, प्रफुल्ल देशमुख, श्रीकृष्ण वैद्य, दीक्षिता तरेकर, श्रीराम बनसोड, रामभाऊ कळंबे, नारायण काकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
270721\img-20210726-wa0016.jpg
नांदगावात किसान सभा व शेतमजूर युनियनचे निदर्शने.