महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर निदर्शने
By Admin | Updated: June 25, 2014 23:33 IST2014-06-25T23:33:04+5:302014-06-25T23:33:04+5:30
महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या व संवर्गाची पदस्थापना देताना कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही.

महसूल कर्मचाऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर निदर्शने
अमरावती : महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या व संवर्गाची पदस्थापना देताना कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा होऊनही तोडगा निघाला नाही. बुधवारी विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले.
महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रशासकीय बदल्या, पुरवठा निरीक्षक, करमणूक कर निरीक्षक या बदल्यांमुळे अन्याय झाला आहे. अव्वल कारकून संवर्गातून मंडळ अधिकारी संवर्गात पदस्थापनेत हाच प्रकार झाल्याचा संघटनेचा आरोप आहे. आपसी बदली तसेच विनंती बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. याउलट निवासी उपजिल्हाकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत असल्याचा आरोप महसूल कर्मचारी संघटनेने केला आहे.
अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गातील गैरसोईच्या झालेल्या बदल्या कर्मचाऱ्यांच्या व प्रशासनाचे सोईने करणे, पुरवठा निरीक्षक, करमणूक कर निरीक्षक व प्रशासकीय बदल्यांमध्ये झालेला अन्याय दूर करणे, खनिकर्म निरीक्षकाचे पद प्रचलीत पद्धतीनुसार सेवाजेष्ठतेने भरणे, कर्मचाऱ्यांची पदोन्नती, कालबद्ध पदोन्नतीमध्ये दुरूस्ती करणे, कर्मचाऱ्यांच्या सेवाजेष्ठता याद्या प्रसिद्ध करणे यासह अन्य मागण्या संघटनेद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे. मागण्या मान्य न झाल्यामुळे बुधवारी महसूल जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर निदर्शने केली. या आंदोलनात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सैय्यद अफझल, कार्याध्यक्ष के. एस. रघुवंशी, सरचिटणीस नामदेव गडलिकंग, क्रिडा सचिव सुशील पवार व जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)