शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

By Admin | Updated: September 20, 2015 00:38 IST2015-09-20T00:38:37+5:302015-09-20T00:38:37+5:30

शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा ...

Demonstrations before the Deputy Director Office of Education | शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने

आंदोलन : विदर्भ माध्यमिक संघाचे निवेदन
अमरावती : शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे निकष विहीत करणारा २८ आॅगस्ट २०१५ चा शासन निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यासाठी शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने व धरणे करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.
आंदोलन कर्त्याच्या प्रमुख मागण्यामध्ये बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषगांने सर्व व्यवस्थापनाच्या नवीन शाळा सुरू कराव्यात, वर्ग जोडणीबाबत नव्याने निर्गमित केलेल्या २८ आॅगस्टच्या शासन निर्णयाने शिक्षण विभागातील सर्व घटकांवर अन्याय होणार आहे.याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर अधिक प्रमाणात विपरित परिणाम करण्याची योजना शासनाने घेतल्याचा आरोप विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने केला असून हा शासन जनर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, याबाबत विमाशि संघाचे सरकार्यावाहकमाजी आमदार व्ही.यु डायगव्हाणे यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांनी लेखी पत्रव्यवहार केला आहे.
मात्र यावर कुठलाही निर्णय घेण्यात न आल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठी विमाशि संघाने निदर्शने करून शासकन व प्रशासनाचे लक्ष वेधून शिक्षण उपसंचालक सोनवणे यांना मागणीचे निवेदन सोपविले आहे. यावेळीे आंदोलनात विमाशिपचे प्रातीय अध्यक्ष एस.जी बरडे, अतुल देशमुख, रामदास बारोटे,विलास हरणे, अरविंद चौधरी दशरथ रसे, जयंत सराटकर, नि,ेश दातीर, अकील अहमद, गजेंद्र शेंडे, गजानन बुरघाटे, विजय वडतकर, अमर घोरपडे, आशिष डेहनकर, महेश निर्मळ, अविनाश जयस्वाल, पांडूरंग चुळे, दिपक चवरे, गणेश सानप, राजेंद्र भस्मे, बन्सीलाल प्रजापती, तिडके आदीसह मुख्याध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demonstrations before the Deputy Director Office of Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.