कोल्हापुरी बंधाऱ्याचे कामात शेतकऱ्याच्या पाईप लाईनची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:42+5:302021-06-04T04:11:42+5:30

दिलेल्या तक्रारींनुसार , मौजा सातनूर शेतशिवारातुन जाणार्या देवना नदीवर जिल्हापरिषद सिंचन विभागाकडून कोल्हापुरी बंधार्याचे काम सुरु आहे . ...

Demolition of farmer's pipeline in Kolhapuri dam work | कोल्हापुरी बंधाऱ्याचे कामात शेतकऱ्याच्या पाईप लाईनची तोडफोड

कोल्हापुरी बंधाऱ्याचे कामात शेतकऱ्याच्या पाईप लाईनची तोडफोड

Next

दिलेल्या तक्रारींनुसार , मौजा सातनूर शेतशिवारातुन जाणार्या देवना नदीवर जिल्हापरिषद सिंचन विभागाकडून कोल्हापुरी बंधार्याचे काम सुरु आहे . याच शेतशिवारात पंकज गुलाबराव चौधरी यांचे शेत आहे . सदर शेतकऱ्याने २०१८-१९ मध्ये मौजा मलकापूर येथून संत्रासह झाडाचे ओळीत करण्याकरिता पीव्हीसी पाईप लाईन टाकली होती . पाणी अडवण्याकरिता देवाण नदीवर बंधाऱ्याचे काम करते वेळी कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून शेतकऱ्याने पुन्हा ती पाईप लाईन काढून नदी काठाने लांबवर टाकली . परंतु कंत्राटदाराने काम करताना जेसीबी आणि पोकलँड ने सदर पाईप लाईन तोडफोड केली . यामुळे फुटलेले पाईप चोरीला सुद्धा गेले . याबाबत कंत्राटदाराच्या सुपरवायझरला सांगितले असता जे होते ते करून घ्या असा दम भरला . यामुळे शेतकऱ्याचे पाईप चे साडेपाच हज़ार रुपये आणि संत्रा आंबिया बहार गळल्याने हजारो रुपयाचे नुकसान झाले . याबाबत पोलीस ठाणे शेंदूरजना घाट येथे लेखी तक्रार दिल्यावरून पोलिसांनी भादंवि चे १८६० नुसार कलम ४२७ अन्वये अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली आहे . सदर प्रकरणाची जिल्हा परिषद सिंचन विभागाकडून चौकशी होई पर्यंत देयके देऊ नये अशीमागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे .

Web Title: Demolition of farmer's pipeline in Kolhapuri dam work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.