लोकशाही दिनात चार प्रकरणे निकाली
By Admin | Updated: April 6, 2016 00:05 IST2016-04-06T00:05:20+5:302016-04-06T00:05:20+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन रामदास सिद्धभट्टी यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले.

लोकशाही दिनात चार प्रकरणे निकाली
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन रामदास सिद्धभट्टी यांच्या उपस्थितीत लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले. या जिल्हा लोकशाही दिनात ११ प्रलंबित प्रकरणांपैकी ४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ३ प्रकरणाचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये पोलीस आयुक्त १, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा १, जिल्हा अधीक्षक, भूमिअभिलेख विभागाचे १, प्रकल्प संचालक राष्ट्रीय राज्य मार्ग क्रमांक ६ प्राधिकरण युनिटचे १, निकाली काढण्यात आले. सोमवारी ४ प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.
लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी विविध विभागाशी संबंधित नागरिकांनी ४० निवेदने दाखल केली. या निवेदनावर संबंधित कार्यालय प्रमुखांनी तातडीने कारवाई करून निवेदनकर्त्याचे समाधान करण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी संबंधित विभागाचे जिल्हाप्रमुख उपस्थित होते.