लोकशाही दिनात आठ प्रकरणे दाखल
By Admin | Updated: August 11, 2015 00:21 IST2015-08-11T00:21:19+5:302015-08-11T00:21:19+5:30
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी प्रभारी उपायुक्त (सामान्य) ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले.

लोकशाही दिनात आठ प्रकरणे दाखल
अहवाल देणार : उपायुक्तांनी दिल्या कारवाईच्या सूचना
अमरावती : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी प्रभारी उपायुक्त (सामान्य) ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनाचे कामकाज करण्यात आले.
विभागातून यासाठी आठ प्रकरणे दाखल करण्यात आलीत. या प्रकरणावर योग्य कार्यवाही करून अहवाल देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना उपायुक्त अग्रवाल यांनी दिल्या. तसेच विविध विभागांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे अनेक दिवस खोळंबून न ठेवता तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिलेत. या विभागीय लोकशाही दिनात सादर करण्यात आलेल्या आठ प्रकरणांत महसूल विभागाशी संबंधित अमरावती जिल्ह्यातील १, बुलडाणा जिलह्यातील १, वाशीम जिल्ह्यातील १ तर अमरावती महापालिकेचे १, अमरावती जिल्हा परिषद १, पोलीस आयुक्तालय अमरावती १, सार्वजनिक बांधकाम (बुलडाणा) १, नगरपरिषद शेगाव १ अशा आठ प्रकरणांचा समावेश होता.
ही प्रकरणे तहसीलदार वैशाली पाथरे यांनी कामकाजासाठी सादर केलीत. विभागीय लोकशाही दिनाच्या कामकाजासाठी यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता शेरेकर, महावितरणच्या मुख्य अभियंत्यांचे प्रतिनिधी उपअभियंता एच.बी.गावंडे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता पी.डी. भामरे, पशू संर्वधनचे प्रादेशिक सहआयुक्त ए. आर. हजारे, जलसंपदाचे सहायक मुख्य अभियंता सं.दी.पांडे व अन्य विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)