विशेष शिक्षक परिचरांचे भीक मांगो आंदोलन
By Admin | Updated: June 29, 2016 00:26 IST2016-06-29T00:26:05+5:302016-06-29T00:26:05+5:30
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाची सेवा अचानक बंद केल्यामुळे विशेष शिक्षक, परिचर हे पाच ते सहा वर्षांपासून सेवेत नाहीत.

विशेष शिक्षक परिचरांचे भीक मांगो आंदोलन
शिक्षणमंत्र्यांचा निषेध : वाहनचालकांना अडवून भीक मागितली
अमरावती : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाची सेवा अचानक बंद केल्यामुळे विशेष शिक्षक, परिचर हे पाच ते सहा वर्षांपासून सेवेत नाहीत. त्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मंगळवारी समावेशित शिक्षक संघाच्यावतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शासन विरोधी नारेबाजी देण्यात आली.
येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात विशेष शिक्षक, परिचरांचे ९ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र नऊ दिवसांपासून या आंदोलनाची शासन, प्रशासन स्तरावर दखल घेतली नाही. परिणामी विशेष शिक्षक, परिचरांनी भीक मांगो आंदोलन पुकारले. हिवाळी अधिवेशनात विशेष शिक्षक, परिचरांचे समायोजन करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिले होते. परंतु पुर्तता करण्यात आली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी वृक्षारोपण, रक्तदान करण्यात आले. थकीत वेतन आणि समायोजनचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यत हे आंदोलन सुरुच राहिल, असा निर्णय विशेष शिक्षक, परिचरांनी घेतला आहे. यावेळी एस.डी. हिवराळे, एम.आर. बोरीकर, एस.बी. लोहे, एस.पी. रुपनारायण, ए.एस. गिरूळकर, ए. एम. गुल्हाणे, आर. बी. राजूरकर, पी. आर. राऊत आदी उपस्थित होते.