शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

मागणी ४६ कोटींची मिळाले २८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 06:00 IST

गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली.

ठळक मुद्देअवकाळीचा मदतनिधी : आता चौथ्या टप्प्याच्या निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दहा दिवसांच्या अवकाळीने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदतनिधीसाठीही शासनाकडून खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. चौथ्या टप्प्याच्या १८.७७ कोटींसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.गतवर्षी १७ ते २८ ऑक्टोबर दरम्यान काढणीला आलेले सोयाबीनला सडले. भिजलेल्या शेंगांमध्ये बीजांकुर निघाले. सोयाबीनचे ८० टक्कयांवर क्षेत्रात नुकसान झाले. सरकीमधूनही बीजांकुर निघाले. कापसाची प्रतवारी खराब झाली. बोंडअळीचा धोका वाढला. आंबिया बहराच्या फुटीसाठी ताण न मिळाल्याने संत्र्याचे नुकसान झाले. अवकाळीने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित निकषापेक्षा जास्त म्हणजेच हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व बहुवार्र्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७२.४० कोटी, दुसऱ्या टप्प्यात १५८ कोटींची मदत मिळाली. तिसºया टप्प्यासाठी ४५ कोटी ९८ लाख ९२ हजार ६६५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली असताना, सोमवारी २७ कोटी ८१ लाख ४३ हजार रुपये उपलब्ध झाले. त्यामुळे मदतीच्या चौथ्या टप्प्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.असे आहे तिसऱ्या टप्प्याचे वाटपअवकाळीच्या मदतीच्या तिसऱ्या टप्प्यात भातकुली तालुक्यात २.२७ कोटी, तिवसा २.९६ कोटी, चांदूर रेल्वे २.९६ कोटी, धामणगाव रेल्वे २.९६ कोटी, नांदगाव खंडेश्वर २.९६ कोटी, मोर्शी १.७५ कोटी, अचलपूर २.९६ कोटी, चांदूर बाजार २.९६ कोटी, दर्यापूर २.९६ कोटी, अंजनगाव सुर्जी २.९६ कोटी, धारणी १० लाख तसेच अमरावती व चिखलदरा तालुक्यात मदतनिधीचे वाटप निरंक आहे.खरीप पिकांचे नुकसानसंयुक्त सर्वेक्षणानुसार ३ लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांच्या २ लाख १२ हजार ३२९ हेक्टरवरील सोयाबीन, १ लाख ३५ हजार ४७२ हेक्टरवरील कपाशी, ११ हजार ३६ हेक्टरवरील ज्वारी, २ हजार ७०६ हेक्टरवरील तूर, ५ हजार ६३ हेक्टरवरील मका, ५ हजार ५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद तसेच ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. एकूण ३ लाख ७३ हजार १९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. याव्यतिरिक्त ४५२ हेक्टर बागायती पिके व ७८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी