रिध्दपूर ग्रामस्थांकडून रस्ता रुंदीकरणाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST2021-03-29T04:08:02+5:302021-03-29T04:08:02+5:30
रिद्धपूर : श्रीक्षेत्र रिद्धपूर येथून गेलेल्या बस्थानक परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण अजूनपर्यंत न केल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले ...

रिध्दपूर ग्रामस्थांकडून रस्ता रुंदीकरणाची मागणी
रिद्धपूर : श्रीक्षेत्र रिद्धपूर येथून गेलेल्या बस्थानक परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण अजूनपर्यंत न केल्यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बसस्थानक दुरुस्ती व रस्त्याचे रुंदीकरण न केल्यास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्ता ढोमने, ग्रामपंचायत सदस्य सचिन डवके व प्रवीण जावरकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश शेळके, गोपाल सेवातकर व ग्रामस्थांनी आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.
या रस्त्याला लागून चार फूट कच्ची नाली खोदकाम केली असून हायमास्ट लाईटदेखील डिव्हायडरमध्ये न लावता रस्त्याच्या बाजूने लावण्यात आले. त्यामुळे एक दिवसआड या ठिकाणी अपघात होत आहेत. येथील बसस्थानक अतिशय लहान असल्यामुळे नागरिकांना उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे येथे मोठा प्रवासी निवारा बांधण्याची मागणी समोर आली आहे.
---------------