रेमडेसिविरची मागणी ९०० ची पुरवठा फक्त ४००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:13 IST2021-05-13T04:13:14+5:302021-05-13T04:13:14+5:30
औषधी प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधीत जेवढे ॲक्टीव रुग्ण आहेत. त्यापैकी ज्या रुग्णांची प्रकृती खालावल्या जाते त्या रुग्णांकरीता उपयुक्त ...

रेमडेसिविरची मागणी ९०० ची पुरवठा फक्त ४००
औषधी प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधीत जेवढे ॲक्टीव रुग्ण आहेत. त्यापैकी ज्या रुग्णांची प्रकृती खालावल्या जाते त्या रुग्णांकरीता उपयुक्त ठरत असलेली रेमडेसिविहरची गरज भासत आहे. अशा रुग्णांकरीता प्रति दिन ९०० रेमडेसिविहर इंजेक्शनची मागणी आहे. मात्र रेमडेसिविहरचा तुटवडा असल्याने प्रति दिन जिल्हा प्रशासनाला ४०० ते ५०० रेमडेसिविहरचा पुरवठा केला जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनानुसार कोविड रुग्णालय व परवानगी देण्यात आलेल्या ३९ कोविड हॉस्पिटल व दोन कोविड हेल्थ केअर सेंटरला रेमडेसिविहरचा पुरवठा करण्यात येते. येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्लयाने रुग्णांना रेमडेसिविहर लावण्यात येत आहे.
बॉक्स:
काही डॉक्टर नातेवाईकांना प्रस्क्रिप्शन
शासनाच्या आदेशानुसार कोविड हॉस्पिटलमधील कोरोना बाधीत रुग्णांच्या नातेवाईकांनी बाहेरुन रेमडेसिविहर इंजेक्शनची व्यवस्था करण्यासाठी प्रस्क्रिप्शन लिहून देवू नये, त्यांना हॉस्पिटलमध्येच मुळ किंमतीत रेमडेसिविहर उपलब्ध करून द्यावे असे आदेश असतानाही काही डॉक्टर सर्व नियम धाब्यावर बसवून रुग्णाची प्रकृती खराब आहे. त्यांना रेमडेसिविहर लावाले लागेल आमच्याकडे ते उपलब्ध नाही? असे म्हणून प्रिस्क्रीप्शन देवून बाहेरुन त्याची व्यवस्था करायला सांगत आहेत. त्यातूनच बाहेर काळाबाजार होत असून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उखळण्याचा गौरखधंदा सुरु आहे. खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये किती रेमडेसिविहर उपलब्ध आहेत. ते गरजू रुग्णांना लावले जातात किंवा नाही?त्याची दैनदिन नोंद घेवून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी मागणी होत आहे.
कोट
सध्या प्रतिदिन ९०० रेमडेसिविहर इंजेक्शनची गरज असताना ४०० ते ५०० रेमडेसिविहर उपलब्ध होत आहे. ते नियमानुसार कोविड हॉस्पिटलला पाठविण्यात येत आहे. तक्रारी आल्यास तपासणी करण्यात येते.
मनिष गोतमारे, औषधी निरीक्षक अमरावती